शाळेला टाळे, मुले वाऱ्यावर
By Admin | Published: July 15, 2015 12:39 AM2015-07-15T00:39:57+5:302015-07-15T00:47:58+5:30
औरंगाबाद : विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडून शांतीनिकेतन पब्लिक स्कूलच्या शिक्षकांनी आज मंगळवारपासून अचानक संप पुकारला
औरंगाबाद : विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडून शांतीनिकेतन पब्लिक स्कूलच्या शिक्षकांनी आज मंगळवारपासून अचानक संप पुकारला, तर संस्थाचालकाने १९ जुलैपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. घटनेमुळे संतप्त पालकांनी संस्थाचालकासोबत बराच वेळ हुज्जत घातली.
सिडको एन-८ परिसरात न्यू जय भारत शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पहिली ते दहावीपर्यंत शांतीनिकेतन पब्लिक स्कूल आहे. या शाळेत संस्थाचालक विरुद्ध शिक्षक असा वाद उफाळला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून संस्थाचालकाने शिक्षकांना पगार दिलेला नाही. त्यामुळे शिक्षकांनी १४ जुलैपासून ४
सिडको एन- ८ मध्ये असणाऱ्या शांतीनिकेतन पब्लिक स्कूलमध्ये यावर्षी ५६८ विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यापैकी अवघ्या ७ विद्यार्थ्यांनी शाळेची फी भरलेली नाही. संस्थाचालक आणि शिक्षक यांच्या वादात मात्र विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. वर्षाकाठी एका विद्यार्थ्याकडून जवळपास १५ हजार रुपये एवढी फी घेतली जाते. मागच्या तीन वर्षांचा आढावा घेतला असता केवळ ७ विद्यार्थ्यांनी फी भरलेली नाही. शाळा व्यवस्थापन मात्र विद्यार्थ्यांनी फी भरली नाही म्हणून शिक्षकांचा पगार होत नसल्याचे सांगत आहे.
दुसरीकडे इमारतीच्या कामासाठी शाळा बंद ठेवण्यात येणार असल्याची नोटीस शाळेच्या गेटवरील बोर्डावर लावण्यात आलेली आहे. शाळा बंद ठेवण्याचे नक्की कारण मात्र शिक्षक-संस्थाचालकाचा वाद असेच असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.