शालेय विद्यार्थ्यांनी आणली लोकमत महामॅरेथॉनमध्ये रंगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 01:26 AM2017-12-18T01:26:08+5:302017-12-18T01:27:25+5:30

लोकमततर्फे आयोजित आणि सॅफ्रॉन लँडमार्क प्रस्तुत औरंगाबाद महामॅरेथॉनच्या मार्गावर ठिकठिकाणी चौकात शालेय विद्यार्थ्यांनी लेझीम खेळून व ढोल वाजवून जोरदार स्वागत केले. विविध शाळांतील सुमारे ३ हजार विद्यार्थ्यांनी धावपटूंचा उत्साह वाढवीत मॅरेथॉनमध्ये रंगत आणली.

 The school students brought color to the mammothothon | शालेय विद्यार्थ्यांनी आणली लोकमत महामॅरेथॉनमध्ये रंगत

शालेय विद्यार्थ्यांनी आणली लोकमत महामॅरेथॉनमध्ये रंगत

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : लोकमततर्फे आयोजित आणि सॅफ्रॉन लँडमार्क प्रस्तुत औरंगाबाद महामॅरेथॉनच्या मार्गावर ठिकठिकाणी चौकात शालेय विद्यार्थ्यांनी लेझीम खेळून व ढोल वाजवून जोरदार स्वागत केले. विविध शाळांतील सुमारे ३ हजार विद्यार्थ्यांनी धावपटूंचा उत्साह वाढवीत मॅरेथॉनमध्ये रंगत आणली.
लोकमत महामॅरेथॉनची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. रविवारी पहाटे ५ वाजेपासून महामॅरेथॉन मार्गावरील प्रत्येक प्रमुख चौकात विविध शाळांचे विद्यार्थी उभे
होते.
कोणी लेझीम खेळत होते, तर कोणी बँड वाजवीत होते. काही मुलांनी धावपटूंवर पुष्पवृष्टी केली, तर काहींनी आॅरेंज गोळ्यांचे वाटप
केले.
धावपटूंइतकाच उत्साह या विद्यार्थ्यांमध्ये पाहावयास मिळाला. लेझीम व बँड पथकांनी शिस्तीचे दर्शन घडविले, तसेच धावपटूंनाही प्रोत्साहन दिले. काही शाळांच्या विद्यार्थ्यांनी फलक घेऊन सामाजिक संदेश दिला. विभागीय क्रीडा संकुल येथून निघालेल्या धावपटूंना पहिला चौक शहानूरमियाँ दर्गा येथून पुढे जावे लागत होते.
तिथे पी.डी.जवळकर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी लेझीम खेळून धावपटूंचे जोरदार स्वागत केले, तसेच दूधडेअरी चौकात शंकरसिंग नाईक विद्यालय, महात्मा ज्योतिबा फुले चौकात (औरंगपुरा) शिशुविहार हायस्कूल, डिमार्ट कॉर्नर (हडको) सुपर थर्टी इंग्लिश स्कूल, टीव्ही सेंटर चौक येथे पद्मश्री शंकरबापू आपेगावकर इंग्लिश स्कूल, ग्रामीण पोलीस अधीक्षक बंगल्याजवळील चौकात वेणूताई चव्हाण कन्या विद्यालय, बळीराम पाटील चौकात बळीराम पाटील हायस्कूल, वोखार्ड चौकात जिजामाता कन्या विद्यालय, सिडको बसस्टँड चौकात तुळजाभवानी विद्यालय, राजर्षी शाहू विद्यालय, सेव्हन हिल येथे अलहुदा ऊर्दू हायस्कूल, तसेच गजानन महाराज मंदिर चौकात ज्ञानप्रकाश विद्यामंदिर, गारखेडा चौकात गजानन बहुउद्देशिय प्रशालेचे विद्यार्थी व शिक्षकांनी धावपटूंचा उत्साह वाढविला.
विभागीय क्रीडा संकुल येथे लोकमत महामॅरेथॉनमध्ये देवगिरी ग्लोबल अकॅडमीच्या कॅडेट फोर्सने शिस्तीचे दर्शन घडविले. कॅडेटच्या अपटू डेट पोशाखात आलेल्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध परेड केली व बँड पथकाने देशभक्तीपर धून वाजविली. यामुळे सोहळ्यात रंगत आली होती.

Web Title:  The school students brought color to the mammothothon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.