शाळा वाऱ्यावर; गुरुजी गुंतले प्रचारात!

By Admin | Published: March 19, 2016 12:10 AM2016-03-19T00:10:46+5:302016-03-19T00:57:05+5:30

बीड : शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा तोंडावर असताना तालुक्यातील शिक्षक नवजीवन शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीने शैक्षणिक वर्तुळात राजकीय गरमागरमी सुरु आहे.

School wind; Guruji engaged in campaign! | शाळा वाऱ्यावर; गुरुजी गुंतले प्रचारात!

शाळा वाऱ्यावर; गुरुजी गुंतले प्रचारात!

googlenewsNext


बीड : शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा तोंडावर असताना तालुक्यातील शिक्षक नवजीवन शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीने शैक्षणिक वर्तुळात राजकीय गरमागरमी सुरु आहे. शाळा वाऱ्यावर सोडून बहुतांश गुरुजी प्रचारात गुंतल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.
३० मार्च रोजी पतसंस्थेच्या १५ संचालकपदासाठी मतदान प्रक्रिया होत आहे. त्यासाठी चार पॅनल आमने- सामने आहेत. ६१ उमेदवार आखाड्यात असून ९५० शिक्षकांना मतदानाचा अधिकार आहे. दरम्यान, निवडणूक पतसंस्थेची असली तरी तिला एखाद्या जि.प. गटातील निवडणुकीचे स्वरुप आले आहे. गुरुजी गटातटाने प्रचार करत आहेत. उमेदवार व पॅनलप्रमुख गाड्यांचा धुराळा उडवत फिरत आहेत. ज्ञानदानाचे काम करणारे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांची चिखलफेक करत असल्याने ही निवडणूक लक्षवेधी ठरत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: School wind; Guruji engaged in campaign!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.