शालेय विद्यार्थिनीचा सर्पदंशाने मृत्यूू
By Admin | Published: September 23, 2014 11:05 PM2014-09-23T23:05:35+5:302014-09-23T23:23:12+5:30
कनेरगाव नाका : हिंगोली तालुक्यातील वांझोळा येथील शालेय विद्यार्थिनीचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना २२ सप्टेंबर रोजी घडली.
कनेरगाव नाका : हिंगोली तालुक्यातील वांझोळा येथील शालेय विद्यार्थिनीचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना २२ सप्टेंबर रोजी घडली.
वांझोळा येथील नेहा ऊर्फ पिंकी सत्यप्रकाश कांबळे (वय १३) या मुलीस सापाने दंश केल्याने तिचा मृत्यू झाला. सदर विद्यार्थिनी कनेरगाव नाका येथील महात्मा फुले विद्यालयात सातवीमध्ये शिकत होती. अत्यंत प्रतिकुल परिस्थिती असतानाही दवाखान्यात उपचार करण्यात आले; परंतु तिला वाचविण्यात डॉक्टरांना यश आले नाही. या विद्यार्थिनीच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (वार्ताहर)
एक जखमी
हट्टा : हट्टा ते झीरोफाटा रस्त्यावरुन हट्टयाकडे पायी जात असताना जीपने पाठीमागून एकास धडक दिल्याची घटना ७ सप्टेंबर रोजी घडली.
झीरोफाटा येथून जात असलेल्या मोहीब हलीमोद्दीन सिद्दीकी (३२, रा. हट्टा ता. वसमत) यास ही धडक बसली. याबाबत हट्टा पोलिस ठाण्यात जीप क्र. ३८ ई १७४० च्या चालकावर गुन्हा दाखल झाला. पुढील तपास सपोउपनि मौला पठाण करीत आहेत.