पालिकेचा जम्बो आराखडा
By Admin | Published: February 23, 2016 12:35 AM2016-02-23T00:35:41+5:302016-02-23T00:41:50+5:30
जालना: आगामी उन्हाळा पाहता नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये म्हणून पालिकेने तब्बल १ कोटी १८ लाख ५० हजार रूपयांचा जम्बो आराखडा सादर केला आहे.
जालना: आगामी उन्हाळा पाहता नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये म्हणून पालिकेने तब्बल १ कोटी १८ लाख ५० हजार रूपयांचा जम्बो आराखडा सादर केला आहे. प्रत्यक्षात एवढ्या मोठ्या आराखड्यास विभागीय आयुक्त मान्यता देण्याची शक्यता नसल्याने जालनेकरांना टंचाईचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत.
जालना शहरातील नवीन जालना भागातील २२ व जुना जालना भागातील २३ झोनसाठी पाणीपुरवठा करण्यात येतो. यात नवीन जालना भागात घाणेवाडी जलशयातून तर जुना जालना भागास जायकवाडी जलवाहिनीतून पुरवठा होतो. मात्र पालिकेच्या नियोजनाअभावी परिस्थिती भयावह आहे. नागरिकांना फेब्रुवारी महिन्यापासूनच भटकंती करावी लागत आहे. पुढील चार महिने पाणी कसे पुरेल, याची चिंता आत्तापासूनच नागरिकांना सतावत आहे. नगर पालिकेने विभागीय आयुक्तांना हा अहवाल सादर केला आहे. टंचाई नियोजनापेक्षा आर्थिक नियोजनच मोठे असल्याचे चित्र आहे. पालिकेने पाठविलेल्या टंचाई आराखड्यात परिपूर्ण व विस्तृत विवेचन पाठविले असले तरी शहरात असे अलबेल याची शाश्वती नाही.
चालू विंधन विहिरींची संख्या ९५० एवढी असल्याचे म्हटले आहे. ५५२ विंधन विहिरींची पाणी पातळी बऱ्यापैकी आहे. ३४८ विंधन विहिरीवरून अत्यल्प पाणीपुरवठा होतो. ५० ठिकाणी वीजपंप बसवून पाणी घेतले जाते. पालिका या ठिकाणावरून सुरळीत पाणीपुरवठा होत असल्याचे म्हणत असले तरी अनेक विंधन विहिरी गायब आहेत. काही तर माहितच नाही. असे असूनही या कृती आराखड्यात नवीन विधिंन विहिरी घेऊन तसेच हँडपंप बसविण्यासाठी पालिकेने तब्बल २९ लाख ५० हजार रूपयांची मागणी केलेली आहे.
दुरूस्तीसाठी पुन्हा १७ लक्ष रूपयांची मागणी केलेली आहे. विशेष म्हणजे याच आराखड्यात पालिकेने ९५० विंधन विहिरीतून बऱ्यापैकी पाणीपुरवठा नागरिकांना होत असल्योच म्हटले आहे. टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी २५ लक्ष रूपयांचे नियोजन करण्यात
आले आहे. वडरवाडी येथे जलवाहिनीसाठी १८ लाख, सिद्धार्थ नगर, एसटी वर्कशॉप परिसरासाठी २० लक्ष तर सटवाई तांडा परिसरातील जलवाहिनीसाठी १० लक्ष
रूपयांचा आराखडा तयार केला
आहे. (प्रतिनिधी)