शेतकऱ्याच्या पुढाकारातून पालटले शाळेचे रुपडे

By Admin | Published: May 12, 2017 12:20 AM2017-05-12T00:20:41+5:302017-05-12T00:23:36+5:30

उमरगा : आपण ज्या शाळेत शिक्षणाचे धडे गिरविले त्या शाळेचे ऋण फेडता यावेत यासाठी तालुक्यातील शालेय समिती अध्यक्ष मनोहर बंडगर यांनी स्वखर्चातून जि.प. शाळेला ‘आयएसओ’ मानांकन मिळवून दिले आहे.

The school's paradigm shifted through the initiative of the farmer | शेतकऱ्याच्या पुढाकारातून पालटले शाळेचे रुपडे

शेतकऱ्याच्या पुढाकारातून पालटले शाळेचे रुपडे

googlenewsNext

मारूती कदम ।
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरगा : आपण ज्या शाळेत शिक्षणाचे धडे गिरविले त्या शाळेचे ऋण फेडता यावेत यासाठी तालुक्यातील कोरेगाव येथील शेतकरी तथा शालेय समिती अध्यक्ष मनोहर बंडगर यांनी स्वखर्चातून कोरेगाव येथील जि.प. शाळेला तालुक्यात सर्वप्रथम ‘आयएसओ’ मानांकन मिळवून दिले आहे.
तालुक्यातील कोरेगाव येथे पहिली ते आठवी पर्यंत जि.प. ची शाळा आहे. नोव्हेंबर २००९ पासून बंडगर समितीच्या अध्यक्षपदी आहेत बंडगर हे अल्पशिक्षीत असले तरी त्यांना शेती व्यवसायाची आवड असल्याने त्यांनी परिसरातील शेतकऱ्यांची ४० एकर शेती हिश्यावर केली आहे. २००६ ते २०११ या कालावधीत शाळेतील ग्रामशिक्षण समितीवर नेमणूक झाली तेंव्हा शाळेत फक्त ३० विद्यार्थी होते. खाजगी शाळांच्या वाढत्या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या संख्येत कमालीची घट झाली होती. शिक्षक संख्या घटल्याने शाळा बंद पडण्याच्या मार्गावर होती. शाळेच्या दरवाजे, खिडक्या तुटल्यामुळे शाळेत जनावरे बांधली जात असत. आपण शिकलेल्या शाळेची दुरावस्था होत असल्याचे शल्य बंडगर यांना पहावत नव्हते.
त्यामुळेच बंडगर यांनी पुढाकार घेत ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून शाळेतील दारे खिडक्यांची दुरुस्ती केली. या शाळेचे माजी विद्यार्थी जगन्नाथ लवटे यांनी दूरदर्शन संच तर विलास राजोळे यांनी स्पीकर संच भेट दिला. ग्रामस्थांच्या देणगीचा ओघ वाढू लागला. आॅगस्ट २०१४ मध्ये मुख्याध्यापक म्हणून श्रीनिवास पवार यांची नियुक्ती या शाळेवर झाली. शालेय समिती आणि मुख्याध्यापक पवार यांनी शाळेचा सर्वांगिण विकास करण्याचा संकल्प केला. लोकवर्गणीतून वर्गखोल्यांचे बांधकाम करण्यात आले. शाळेतील संपूर्ण लाईट फिटींगचे काम बंडगर यांनी श्रमदानातून विनामुल्य करुन दिले. शाळेच्या परिसरात विना विद्युत ठिबक सिंचनाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या आमदार निधीतून शाळेला कुपनलिका देण्यात आली असून, या कुपनलिकेला तीन इंच पाणी लागल्याने भर उन्हाळ्यातही शाळेच्या परिसरातील झाडे हिरवीगार आहेत. चिंच, जांभळ, आंबा, सिताफळ, रामफळ, लिंबू, भाजीपाला, परसबाग, शोभेची फुलझाडे या निसर्ग सौंदर्याने शाळेचा संपूर्ण परिसर नटल्याचे दिसून येत आहे.
शाळेच्या नावलौकीकात वाढ व्हावी, शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागावी, विद्यार्थ्यांची शंभर टक्के उपस्थिती रहावी, यासाठी बंडगर यांनी शाळेतील मुख्याध्यापक श्रीनिवास पवार, अरुणा वाघे (बनसोडे), वैशाली चिट्टे, उर्मिला मुसळे, अंगद थिटे, राजकुमार रामतीर्थ या शिक्षकांच्या सहकार्यातून शाळेच्या संपूर्ण भिंती बोलक्या केल्या. ज्ञानरचनावादावर या शाळेतील विद्यार्थ्यांना ई-लर्निंगचे शिक्षण दिले जात आहे.

Web Title: The school's paradigm shifted through the initiative of the farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.