गुंतवणुकीचे शास्त्र अभ्यासक्रमात यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:05 AM2021-03-14T04:05:26+5:302021-03-14T04:05:26+5:30
जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात सीमा पाटील यांनी ‘मी, पैसा व गुंतवणूक’ याविषयी संवाद साधला आणि गुंतवणुकीचे शास्त्र ...
जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात सीमा पाटील यांनी ‘मी, पैसा व गुंतवणूक’ याविषयी संवाद साधला आणि गुंतवणुकीचे शास्त्र अभ्यासक्रमात आणण्याची किती गरज आहे, याविषयी मार्गदर्शन केले.
दि. १० मार्च रोजी झालेल्या या कार्यक्रमात योगिता बेंडसुरे यांनी महिला दिनाचे महत्त्व व सामाजिकतेचे भान याविषयी प्रास्ताविक केले. महिलांशी संवाद साधताना पाटील म्हणाल्या की, पैशाचे नियोजन करताना बऱ्याचदा आपण कमी पडतो. महिन्याची मिळकत व खर्च यांची सांगड घालणे व त्यातून पैशांची बचत करून गुंतवणूक करणे, हे संस्कार मुलांना कुटुंबातूनच मिळायला पाहिजेत. महिला या नियोजन गुरू आहेत, असे सांगत पाटील यांनी गुंतवणुकीच्या विविध पर्यायांची आणि सरकारी योजनांची माहिती दिली.
ॲड. अंजली कुलकर्णी यांनी पाहुण्यांचा परिचय तर ॲड. जोती पत्की यांनी स्वागत केले. कार्यक्रमादरम्यान १०४ वर्षांच्या सरुबाई शिवले यांच्या हस्ते महिलांना बक्षिस वाटप करण्यात आले. सविता कुलकर्णी, सरस्वती पोरे, राधा संपकाल, अंकिता बोरकर, जोती पत्की, रेखा बासरकर, जयश्री रगडे यांनी विविध खेळांत बक्षिसे मिळविली.
फोटो ओळ :
जागृती मंच आयोजित कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिला.