स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांमध्ये वि. का. मौर्य यांचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:24 AM2020-12-17T04:24:34+5:302020-12-17T04:24:34+5:30
औरंगाबाद : अमेरिकेतील जगप्रसिद्ध स्टॅनफोर्ड विद्यापीठाने जगभरातील विविध विषयांत संशोधन करणाऱ्या २ टक्के शास्त्रज्ञांची यादी तयार केली आहे. यात ...
औरंगाबाद : अमेरिकेतील जगप्रसिद्ध स्टॅनफोर्ड विद्यापीठाने जगभरातील विविध विषयांत संशोधन करणाऱ्या २ टक्के शास्त्रज्ञांची यादी तयार केली आहे. यात औरंगाबादेतील शासकीय औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वि. का. मौर्य यांचा समावेश केला आहे. आतापर्यंत या यादीत शहरातील ३ प्राध्यापकांचा समावेश झाला आहे.
विवेकानंद महाविद्यालयातील कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा. डॉ. सागर शिरसाठ आणि वाय. बी. चव्हाण औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयातील डॉ. जयप्रकाश संगशेट्टी यांचा समावेश स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या दोन टक्के शास्त्रज्ञांमध्ये केला होता. यानंतर शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वि. का. मौर्य यांची निवड केली आहे. शहरातील आतापर्यंत ३ प्राध्यापकांना हा बहुमान मिळाला आहे. डॉ. मौर्य यांनी मॉलिक्यूलर मेडिसनमध्ये केलेल्या संशाेधनाची दखल स्टॅनफोर्ड विद्यापीठाने घेतली. या क्षेत्रातील केलेल्या संशोधनाचे पेपर आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाले असून एच- इनडेक्स, आय- इनडेक्स उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.
राज्यातील शासकीय औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयातून स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांमध्ये समोवश होणारे डॉ. मौर्य हे एकमेव प्राध्यापक आहेत. मॉलिक्यूलर मेडिसनमध्ये संशोधन करणाऱ्या दोन टक्के शास्त्रज्ञांमध्ये डॉ. मौर्य यांचा समावेश झाल्यामुळे महाविद्यालयाचे मानांकनही वाढण्यास मदत होणार आहे.
फोटो ओळ : प्राचार्य डॉ. वि. का. मौर्य यांचा सत्कार करताना तंत्रशिक्षण सहसंचालक डॉ. महेश शिवणकर.