‘ब्रेक द चेन’ला हरताळ फासणारी ७ दुकाने सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:04 AM2021-05-06T04:04:02+5:302021-05-06T04:04:02+5:30

उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, तहसीलदार संजय वारकड यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. रामेश्वर रेंगे, प्रभारी मुख्याधिकारी शेख हारून यांच्या ...

Seal 7 shops on strike for 'Break the Chain' | ‘ब्रेक द चेन’ला हरताळ फासणारी ७ दुकाने सील

‘ब्रेक द चेन’ला हरताळ फासणारी ७ दुकाने सील

googlenewsNext

उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, तहसीलदार संजय वारकड यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. रामेश्वर रेंगे, प्रभारी मुख्याधिकारी शेख हारून यांच्या संनियंत्रणात तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन शहर, नगर परिषद यांच्या संयुक्त पथकाने शहरात नियमांचा भंग करणाऱ्या सात दुकानांवर कारवाई केली. यात आकाशदीप कापड दुकान, जॉन डिअर ट्रॅक्टर एजन्सी, श्रीकृष्ण हार्डवेअर यांसह दोन हेअर सलून व दोन दुचाकी वाहनांचे गॅरेज यांचा समावेश असून, सदर दुकानांवर दंडनीय कारवाई करण्यात येत आहे. यामधून ३ लक्ष ५० हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात येणार आहे. शहरात पोलीस विभागामार्फत फिरत्या वाहनांतून आदेशाचा भंग करणाऱ्या ४९ दुकानांचे फोटो काढण्यात आलेले असून, त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

सदर पथकामध्ये अव्वल कारकून सत्यजीत आव्हाड, मंडळ अधिकारी आबा पाटील, पीएसआय भूषण सोनार, तहसीलचे राहुल खंदारे, कुणाल दाभाडे, तलाठी आशिष सुरपाम, सुनील कोठावदे, एरंडे, नगर परिषदेचे निकम, कदम, नारायण कनगरे यांचा समावेश होता.

Web Title: Seal 7 shops on strike for 'Break the Chain'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.