मराठवाड्यातील आठ मंडळांत सलग दुसऱ्या दिवशी अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 07:21 AM2018-06-25T07:21:30+5:302018-06-25T07:23:39+5:30

मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. ३० मंडळांतील अतिवृष्टीनंतर दुस-या दिवशी अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

For the second consecutive day in eight congregations in Marathwada, | मराठवाड्यातील आठ मंडळांत सलग दुसऱ्या दिवशी अतिवृष्टी

मराठवाड्यातील आठ मंडळांत सलग दुसऱ्या दिवशी अतिवृष्टी

औरंगाबाद : मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. ३० मंडळांतील अतिवृष्टीनंतर दुस-या दिवशी रविवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत विभागातील आठ महसुली मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

महिन्याच्या सुरुवातीला औरंगाबाद, जालना वगळता इतर जिल्ह्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. ११ जून रोजी मराठवाड्यातील २४ मंडळांत अतिवृष्टी झाली. त्यानंतर १२ जून ते २० जून, असा आठ दिवस पावसाचा खंड शेतक-यांसह सर्वांना चिंतातूर करून गेला. परंतु दोन दिवसांनंतर पावसाचे ‘कमबॅक’ झाले. शनिवारी सकाळपर्यंत परभणी, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांत वरुणराजा दमदार बरसला. त्या जिल्ह्यातील ३० मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली.

जून महिन्याच्या सुरुवातीला लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांत पावसाची दमदार हजेरी सुरू आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत जोरदार पाऊस होत असताना औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांकडे मात्र पावसाने पाठ फिरविली आहे. आतापर्यंत जिल्ह्यांत अपेक्षित सरासरीच्या तुलनेत केवळ ७९ तर जालना जिल्ह्यांत ८६ टक्के पाऊस झाला आहे. तर परभणी जिल्ह्यात १५३, हिंगोली १५९, नांदेड १६७, बीड १२२, लातूर २०६ तर उस्मानाबाद जिल्ह्यांत अपेक्षित सरासरीच्या तुलनेत तब्बल १३७ टक्के पाऊस झाला आहे.

या मंडळात दणक्यात बरसला
रविवारी सकाळपर्यंत औरंगाबाद जिल्ह्यातील करमाड (९६ मि.मी.), फुलंब्री (८० मि.मी.), नांदेड जिल्ह्यातील सरसम (६९ मि.मी.), बीड जिल्ह्यातील पाटोदा (७० मि.मी.), थेरला (१३० मि.मी.), दासखेडा (७२ मि.मी.), दौलावडगाव (९८ मि.मी.), अंबाजोगाई (६८ मि.मी.) येथे अतिवृष्टी झाली.

औरंगाबादेत १४.५६ मि.मी. पावसाची नोंद
औरंगाबाद जिल्ह्यात १४.५६ मिलीमीटर, जालना ३.१८, परभणी १२.३३, हिंगोली १५.७५, नांदेड १०.०३, बीड २४.३३, लातूर १६.१६ तर उस्मानाबाद जिल्ह्यात ११.६८ मिलीमीटर पाऊस झाला.

Web Title: For the second consecutive day in eight congregations in Marathwada,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.