सिल्लोडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी अपघात; कन्नड रोडवर बस-दुचाकीत अपघात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2023 07:26 PM2023-03-04T19:26:14+5:302023-03-04T19:26:34+5:30

सिल्लोड - कन्नड रस्त्यावर अपघाताची मालिका

Second consecutive day of accidents in Sillod; Bus-bicycle accident on Kannada Road | सिल्लोडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी अपघात; कन्नड रोडवर बस-दुचाकीत अपघात

सिल्लोडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी अपघात; कन्नड रोडवर बस-दुचाकीत अपघात

googlenewsNext

सिल्लोड:  सिल्लोड - कन्नड रस्त्यावर माणेवाडी फाट्यावर बस आणि दुचाकीत आज दुपारी १२.३० वाजता अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार जगन शेनफड दुधे (४५ रा. रजाळवाडी ) हे गंभीर जखमी झाले आहेत. सिल्लोडमध्ये शुक्रवारी बस आणि पिकअप वाहनात अपघात झाला होता. त्यानंतर आज सलग दुसऱ्या दिवशी देखील येथे अपघात झाला.

जगन दुधे हे दुचाकीत ( क्रमांक एम एच २० ए एल ५४२७ ) पेट्रोल टाकण्यासाठी रजाळवाडीवरून सिल्लोडकडे येत होते. तर एसटी बस ( क्रमांक एम एच २० बी एल ३७०४ (सिल्लोड-पाचोरा) ही सिल्लोडहून पाचोराकडे जात होती. सिल्लोड कन्नड रस्त्यावरील मानेवाडी फाट्यावर दुचाकी आणि बसमध्ये अपघात झाला. दरम्यान, दुचाकीस्वारास वाचविण्याच्या प्रयत्नात बसचा देखील अपघातापासून थोडक्यात बचावली. बसमधील ६० प्रवासी सुरक्षित आहेत. अपघातामुळे रस्त्यावरील वाहतूक खोळंबली होती. शहर पोलीस ठाण्याचे फौजदार बापूसाहेब झिंजुर्डे व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली.

रस्ता बनला मृत्यूचा सापळा
सिल्लोड-कन्नड रस्ता हा आता गूळगुळीत झाल्यामुळे प्रत्येक वाहन भरधाव वेगाने असते.  वेगमर्यादा येथे राहिली नाही वळणावर व रस्ता क्रास करताना वाहन धारक लक्ष देत नाही. शिवाय या रस्त्यावरील पुलाचे काम निकृष्ठ झाले आहे. अनेक वाहने येथे आदळत असून त्यानंतर चालकाचा वाहनावरील ताबा सुटून अपघात होतत. कालच्या अपघातात देखील पुलावर वाहन उडाल्याने पिकअपची एसटी बससोबत धडक झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

Web Title: Second consecutive day of accidents in Sillod; Bus-bicycle accident on Kannada Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.