महाराष्ट्राचा सलग दुसरा पराभव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 12:32 AM2019-02-19T00:32:59+5:302019-02-19T00:33:23+5:30
साईच्या पश्चिम विभागीय केंद्राच्या अॅस्ट्रो टर्फवर सुरू असलेल्या ज्युनिअर राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत ओडिशा संघाने महाराष्ट्रावर २-१ असा विजय मिळविला. महाराष्ट्राचा हा सलग दुसरा पराभव ठरला. दरम्यान हरियाणा संघाने विजयी घोडदौड कायम ठेवताना सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली.
औरंगाबाद : साईच्या पश्चिम विभागीय केंद्राच्या अॅस्ट्रो टर्फवर सुरू असलेल्या ज्युनिअर राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत ओडिशा संघाने महाराष्ट्रावर २-१ असा विजय मिळविला. महाराष्ट्राचा हा सलग दुसरा पराभव ठरला. दरम्यान हरियाणा संघाने विजयी घोडदौड कायम ठेवताना सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली.
‘क’ गटातील सामन्यात व्यंकटेश केचे याने २८ व्या मिनिटाला गोल करताना महाराष्ट्राला १-० अशी आघाडी मिळवून दिली; परंतु ओडिशा संघाने उत्तरार्धात जबरदस्त मुसंडी मारली. अमरदीप लाकरा याने ३६ व्या मिनिटाला गोल करून ओडिशाला बरोबरी साधून दिली तर ५१ व्या मिनिटाला गे्रगोरी झेस याने गोल करून ओडिशाचा विजय निश्चित केला.
हरियाणा संघाने आपली विजयी घोडदौड कायम ठेवताना सोमवारी झारखंड संघावर ३-२ अशी मात करून ‘ब’ गटात अव्वल स्थान मिळविले. हरियाणाकडून चौथ्या आणि ३६ व्या मिनिटाला असे दोन गोल करून अंकुशने विजयात निर्णायक भूमिका बजावली. त्यांच्याकडून तिसरा गोल परमितने ५२ व्या मिनिटाला केला. झारखंडकडून अनुरुद भेंगरा आणि राजू होरो यांनी गोल केले.
‘ब’ गटातील लढतीत पहिल्या दिवशी पराभवाची चव चाखणाºया मणिपूरने दुसºया दिवशी मुंबई संघावर ४-३ अशी मात केली. त्यांच्याकडून नीरजकुमार वारीबामने याने १९ व्या व ४७ व्या मिनिटाला तर रोहित इरेंगबाम याने २८ व्या व ३२ व्या मिनिटाला गोल करून मणिपूर संघाकडून निर्णायक भूमिका बजावली. मुंबईकडून अनिल राठोडने ३८ व्या आणि मोहित कथोटे याने ४३ व्या मिनिटाला प्रत्येकी १ गोल केला. तामिळनाडूकडून पराभवाला सामोरे जाणाºया गत विजेत्या पंजाबने सर्व्हिसेस स्पोर्ट कंट्रोल बोर्ड संघावर ५-१ अशी मात केली. पंजाबकडून सिमरन ज्योत याने ३ ºया व ७ व्या मिनिटाला, विशालजितसिंगने ४९ व्या, रमण कुमारने ५३ व्या व अंगदबीरसिंगने ६० व्या मिनिटाला गोल केले. पराभूत संघाकडून दीपकने १२ व्या मिनिटाला गोल केला. तामिळनाडू व हिमाचल प्रदेश यांच्यातील लढत २-२ अशी बरोबरीत सुटली. तामिळनाडूकडून एस. कार्थीने ४४ व्या व एस. मरीश्वरनने ४८ व्या मिनिटाला गोल केला. हिमाचल प्रदेशकडून चरणजितसिंग आणि अमित यांनी अनुक्रमे ५७ व्या व ५९ व्या मिनिटाला गोल करून तामिळनाडूला विजयापासून वंचित ठेवले.