हागणदारीमुक्तीचा दुसरा टप्पा यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 12:46 AM2017-08-22T00:46:23+5:302017-08-22T00:46:23+5:30
बीड शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी पालिकेने कंबर कसली असून राज्यस्तरीय समितीच्या तपासणीत बीड पालिका यशस्वी झाली आहे. पहिले दोन टप्पे पार करणाºया पालिकेने आता केंद्रीय समितीच्या तपासणीला सामोरे जाण्यासाठी सज्ज झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : बीड शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी पालिकेने कंबर कसली असून राज्यस्तरीय समितीच्या तपासणीत बीड पालिका यशस्वी झाली आहे. पहिले दोन टप्पे पार करणाºया पालिकेने आता केंद्रीय समितीच्या तपासणीला सामोरे जाण्यासाठी सज्ज झाली आहे.
स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत शौचालय बांधा, वापरा तसेच सार्वजनिक शौचालयांचा उपयोग करा, अशा आशयाचे आवाहन केले जात आहे. तसेच त्यांना वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी अनुदानही दिले जात आहे. काहींना पहिला टप्पा वितरीतही करण्यात आला आहे. त्यामुळे बीड शहर हागणदारीमुक्तीच्या दृष्टीने पाऊल टाकत आहे.
गत आठवड्यात उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांच्या जिल्हास्तरीय समितीने शहराची पाहणी करून पालिकेला पास केले होते. त्यानंतर रविवारी रात्री व सोमवारी सकाळी लातूर महापालिकेचे उपायुक्त मिनीनाथ दंडवते यांच्या राज्यस्तरीय समितीने शहराची तपासणी केली. सोमवारी रात्री इंदिरा नगरसह परिसरातील ओ.डी.स्पॉटची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला. त्यानंतर सोमवारी सकाळीही शहरातील सर्व ओ.डी.स्पॉट, शाळा, महाविद्यालये, बचत गट, विद्यार्थी यांच्या भेटी घेऊन संवाद साधण्यात आला. त्यानंतर दुपारी एक वाजता बीड पालिकेत याबाबत निकाल घेऊन त्याचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. यामध्ये बीड पास झाल्याचे नमूद केल्याचेही खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. या समितीने पाथरीचे मुख्याधिकारी देविदास जाधव, झरी येथील माधव पाटील झरीकर, रविंद्र केसरकर यांचा समावेश होता.