दुसºया सत्रातही गणवेश दुकानातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 12:22 AM2017-11-10T00:22:15+5:302017-11-10T00:22:20+5:30

मोफत शालेय गणवेश योजना जिल्ह्यात बारगळली आहे. शिवाय एकाही तालुक्याने याबाबत शिक्षणाधिकाºयांकडे अहवाल सादर केला नाही. शैक्षणिक वर्षाचे दुसरे सत्र सुरू झाले तरी अद्याप विद्यार्थ्यांच्या हाती गणवेश पडले नाहीत. त्यामुळे अनेक मुलांना जुन्याच गणवेशावर शाळेत हजर रहावे लागले.

In the second session, the uniform is also in a shop | दुसºया सत्रातही गणवेश दुकानातच

दुसºया सत्रातही गणवेश दुकानातच

googlenewsNext

हिंगोली : मोफत शालेय गणवेश योजना जिल्ह्यात बारगळली आहे. शिवाय एकाही तालुक्याने याबाबत शिक्षणाधिकाºयांकडे अहवाल सादर केला नाही. शैक्षणिक वर्षाचे दुसरे सत्र सुरू झाले तरी अद्याप विद्यार्थ्यांच्या हाती गणवेश पडले नाहीत. त्यामुळे अनेक मुलांना जुन्याच गणवेशावर शाळेत हजर रहावे लागले.
सर्व शिक्षा अभियानातील मोफत गणवेश योजनेत २०१७-१८ मध्ये ७४ हजार पात्र विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटपाचे शिक्षण विभागाला उद्दिष्ट होते. मात्र शैक्षणिक वर्षाचे दुसरे सत्र आले तरही विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ मिळाला नाही. शिवाय अनेक विद्यार्थ्यांचे अद्यापही खाते उघडण्यात आली नाहीत. आपल्या पाल्याचे बँकेत खाते उघडून घ्यावेत असे पालकांना सांगण्यासत आले आहे. परंतु खोते उघडण्यात आले नाहीत, त्यामुळे योजनेचा विद्यार्थ्यांना लाभ मिळेना असे शिक्षण विभागाकडून सांगितले जात आहे. परंतु यासाठी संबधित शिक्षण विभागाची यंत्रणाही याकडे दुर्लक्ष करीत असल्याने तेही तितकेच जबाबदार आहेत. या विविध कारणांमुळे मात्र जिल्ह्यात योजना बारगळल्याचे चित्र आहे. या ताळमेळात अजान बालकांना शासनाच्या योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. जिल्ह्यात एकूण ७४ हजार विद्यार्थी गणेवशास पात्र आहेत. एका विद्यार्थ्यास दोन गणवेशासाठी ४०० रूपये रक्कम दिली जाणार आहे. त्यासाठी २ दोन कोटी ९९ लाख १८ हजार ६०० रूपयांचा निधी शासनाकडून मंजूर झाला आहे. संबधित शाळांना तालुकानिहाय निधीही वर्ग करण्यात आला आहे. पालकांनी याकडे लक्ष देऊन बँकेत खाते उघडून घ्यावीत, असे आवाहन शिक्षण विभागातर्फे केले जात आहे. बँकेत शून्य बजेटवर खाते उघडून दिली जात असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: In the second session, the uniform is also in a shop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.