मॉडेल रेल्वेस्टेशनचा दुसरा टप्पा रेंगाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 12:49 AM2018-02-10T00:49:48+5:302018-02-10T00:49:54+5:30

मॉडेल रेल्वेस्टेशनच्या दुस-या टप्प्यातील काम गेल्या अडीच वर्षांपासून रेंगाळले आहे. निधीअभावी हे काम २०१८ मध्येही सुरू होण्याची शक्यता नाही

The second stage of the model railway station lingers | मॉडेल रेल्वेस्टेशनचा दुसरा टप्पा रेंगाळला

मॉडेल रेल्वेस्टेशनचा दुसरा टप्पा रेंगाळला

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मॉडेल रेल्वेस्टेशनच्या दुस-या टप्प्यातील काम गेल्या अडीच वर्षांपासून रेंगाळले आहे. निधीअभावी हे काम २०१८ मध्येही सुरू होण्याची शक्यता नाही. दुसरीकडे एसटी महामंडळाकडून मध्यवर्ती बसस्थानकात उभारण्यात येणारे ‘बसपोर्ट’देखील रखडले आहे. केवळ कागदोपत्रीच प्रवाशांना सुसज्ज सोयी-सुविधांची स्वप्ने दाखविली जात आहेत.
औरंगाबाद रेल्वेस्टेशनचा मॉडेल रेल्वेस्टेशनमध्ये समावेश झाला आणि पहिल्या टप्प्यात भव्य इमारत उभी राहिली. मॉडेल रेल्वेस्टेशनच्या दुस-या टप्प्यात रेल्वेस्टेशनच्या जुन्या इमारतीच्या जागेत विकासकामे केली जाणार आहेत.
पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर तात्काळ दुस-या टप्प्यातील काम सुरू होणे अपेक्षित होते; परंतु तसे झाले नाही. ३ जुलै २०१५ रोजी दुस-या टप्प्यातील जुन्या इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजनही झाले; परंतु अडीच वर्षांनंतरही हे काम सुरूच झालेले नाही.

Web Title: The second stage of the model railway station lingers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.