विदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना २८ दिवसानंतर दुसरी लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:05 AM2021-06-09T04:05:46+5:302021-06-09T04:05:46+5:30
औरंगाबाद : विदेशात उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण मागील आठवड्यात महापालिकेतर्फे करण्यात आले. त्यांना दुसरा डोस नियमानुसार ८४ दिवसानंतर ...
औरंगाबाद : विदेशात उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण मागील आठवड्यात महापालिकेतर्फे करण्यात आले. त्यांना दुसरा डोस नियमानुसार ८४ दिवसानंतर देण्यात येणार होता. तीन महिने विद्यार्थी वाट बघू शकत नाही. त्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती आहे. त्यांना २८ दिवसानंतर दुसरा डोस देण्याची मुभा शासनाने महापालिकेला दिली आहे.
३५० पेक्षा अधिक विद्यार्थी आणि नागरिकांना विशेष मोहीम राबवून मनपातर्फे लस देण्यात आली. काही विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी विदेशात जाणार आहेत. नागरिकांना नोकरीसाठी विदेशात जावे लागणार आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने मान्यता दिलेली लस घेऊनच यावे, असा नियम इतर देशांनी केला आहे. त्यामुळे मागील तीन महिन्यापासून विदेशात जाणारे विद्यार्थी हवालदिल झाले होते. महाराष्ट्र शासनाने विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन या विद्यार्थ्यांना लस दिली. सर्वांना कोविशिल्ड लस देण्यात आली. लसचा दुसरा डोस ८४ दिवसानंतर द्यावा, असा नियम आहे. तीन महिने विद्यार्थी थांबू शकत नाही. त्यांना लवकरात लवकर डोस द्यावा, अशी मागणी महापालिकेकडे सातत्याने करण्यात येत होती. शासनाची परवानगी घेतल्यानंतर आता या विद्यार्थ्यांना २८ दिवसानंतर लस देण्यात येणार आहे.