कन्नड तालुक्यासाठी दुसरी लाट ठरली घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:04 AM2021-05-06T04:04:57+5:302021-05-06T04:04:57+5:30

कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर जनजीवन पूर्वपदावर यायला कुठे सुरुवात झाली होती. कोरोना गेला अशा भ्रमात राहून भरगच्च लोकांच्या उपस्थितीत ...

The second wave was fatal for Kannada taluka | कन्नड तालुक्यासाठी दुसरी लाट ठरली घातक

कन्नड तालुक्यासाठी दुसरी लाट ठरली घातक

googlenewsNext

कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर जनजीवन पूर्वपदावर यायला कुठे सुरुवात झाली होती. कोरोना गेला अशा भ्रमात राहून भरगच्च लोकांच्या उपस्थितीत विवाहसमारंभ, राजकीय कार्यक्रम,धा र्मिक कार्यक्रम होऊ लागले. थांबलेल्या बसची चाके प्रवाशांच्या गर्दीमुळे फिरू लागली, दुकानांमधील गर्दी फुलू लागली आणि तोच १ फेब्रुवारी २०२१ पासून दुसरी लाट आली. लाट इतकी भयंकर आली की, या लाटेने तालुक्यात कहर केला. या लाटेत तालुक्यात एकूण ३ हजार ४२७ जणांना बाधा झाली. त्यापैकी २ हजार ७७० रुग्ण बरे झाले. ५६६ जणांवर उपचार सुरू असून, ९१ जण मरण पावले. त्यापैकी तालुक्यातील ग्रामीण भागात २ हजार ५४८ जणांना बाधा झाली. त्यापैकी १ हजार ९८८ रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर ५०६ जणांवर उपचार सुरू आहेत. मात्र, या लाटेत ५४ जणांना ओढून नेण्यात कोरोना यशस्वी झाला.

दुसऱ्या लाटेत तालुक्यात सर्वांत जास्त रुग्ण शहरात म्हणजे ८७९ जण कोरोनाबाधित झाले. त्यापैकी ७८२ जण कोरोनामुक्त झाले, तर ६० जणांवर उपचार सुरू आहेत. मात्र, ३७ जण कोरोनाशी लढाई करताना हरले. ग्रामीणमध्ये पिशोर गाव या लाटेत सर्वांत जास्त बाधित झाले. या गावात १८८ बाधित झाले. त्यापैकी १३३ रुग्ण उपचारानंतर बरे झाले, तर ५१ जणांवर उपचार सुरू आहेत. यात ४ जणांचा मृत्यू झाला आहे.

चौकट

नियमांचा नागरिकांकडून फज्जा

कडक लॉकडाऊन असले तरी शहरात सकाळी ११ वाजेपर्यंत रस्त्यावर, भाजी मंडीत यात्रेचे स्वरूप असते. यात सामाजिक अंतराचा फज्जा उडतो, तर विनामास्क फिरणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात असते आणि कोरोनाचा प्रसार होण्यासाठी ही कारणे पुरेशी आहेत. लॉकडाऊनच्या नियमावलीचे पालन करावे, असे वारंवार आवाहन करूनही काही दुकानदार पालन करीत नसल्याचे दिसून आल्यानंतर प्रशासनाने कारवाईचा दंडुका उगारण्यास सुरुवात केली आहे.

कोट

नागरिकांचा भर होम आयसोलेशनवर जास्त असल्याने भरती असलेल्या रुग्णांची संख्या कमी दिसत आहे, तर तपासण्यांचे प्रमाण कमी झाल्याने रुग्णसंख्या घटली. मात्र, अजूनही कोरोनाचा प्रभाव कमी झालेला नाही.

-डॉ. प्रवीण पवार, वैद्यकीय अधीक्षक.

Web Title: The second wave was fatal for Kannada taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.