माध्यमिक शाळा दुरुस्ती व बांधकामाचे नियोजन सुरु
By | Published: December 6, 2020 04:01 AM2020-12-06T04:01:28+5:302020-12-06T04:01:28+5:30
औरंगाबाद : माध्यमिक शाळांच्या बांधकाम व दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजनच्या वार्षिक योजतेनून ३ कोटी रुपये मंजूर आहेत. त्यापैकी शासन निर्देशानुसार ...
औरंगाबाद : माध्यमिक शाळांच्या बांधकाम व दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजनच्या वार्षिक योजतेनून ३ कोटी रुपये मंजूर आहेत. त्यापैकी शासन निर्देशानुसार ३३ टक्के प्रमाणे ९९ लाखांचा निधी मिळणार आहे. गेल्यावर्षीचा शिल्लक ५३ लाखांचा निधी व दायित्व २१.५१ लाख दिल्यावर नियोजनाकरिता १.३० कोटी मिळणार आहेत, अशी माहिती शिक्षण सभापती अविनाश गलांडे यांनी दिली.
नियोजनाकरिता मिळालेल्या निधीच्या दीडपट म्हणजे १ कोटी ९५ लाखांची कामे ३३ टक्के निधीतून होऊ शकतील. तर १०० टक्के निधी मिळाल्यास दीडपटनुसार ४ कोटी ९७ लाखांची कामे करता येऊ शकतील, असे गलांडे यांनी सांगितले. जिल्हा नियोजनमधून ३३ टक्केप्रमाणे निधी मिळेल. काही निधी १०० टक्के देण्यात येणार आहे. मात्र, जिल्हा नियोजन समितीला अद्याप नियोजन विभागाकडून त्या संदर्भात मार्गदर्शक सूचना येण्याची प्रतीक्षा असल्याचे डीपीडीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे मुख्य वित्त व लेखा अधिकारी अप्पासाहेब चाटे यांनी सांगितले.