औरंगजेब कबरीचं सुरक्षा कवच वाढवलं, पत्राच्या वर लावली काटेरी तार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 13:31 IST2025-03-22T13:30:14+5:302025-03-22T13:31:40+5:30
औरंगजेब कबरीच्या पाठीमागील बाजूस ठोकलेल्या पत्र्यावर आता काटेरी तार लावली आहे.

औरंगजेब कबरीचं सुरक्षा कवच वाढवलं, पत्राच्या वर लावली काटेरी तार
- सुनील घोडके
खुलताबाद: खुलताबाद येथील औरंगजेब कबर प्रकरण देशभर गाजत असतानाच प्रशासन मात्र कबरीच्या सुरक्षेत वाढ करताना दिसत आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी घेताना दिसत आहे. औरंगजेब कबरीच्या पाठीमागील बाजूस ठोकलेल्या पत्र्यावर आता काटेरी तार लावली आहे.
मुघल सम्राट औरंगजेब यांची कबर उखडून फेकण्याचा इशारा काही हिंदुत्वादी संघटनेने दिला होता त्यानंतर नागपूर येथे झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने औरंगजेब कबरीच्या सुरक्षेत वाढ केली असून पोलीस बंदोबस्ताबरोबरच औरंगजेब यांचे गुरू सय्यद जैनोद्दीन चिश्तीच्या दर्गेच्या बाजूस( कबरीच्या पाठीमागील बाजूस) काही दिवसांपूर्वी पत्रे लावली होती त्यामुळे कुणीही औरंगजेब कबरीजवळ जावूच शकत नाही मात्र आता शुक्रवारी प्रशासनाने पत्र्याच्या वर काटेरी तारेचे कुंपन लावले असल्याने कुणी पत्र्यावर चढून आत मध्ये जाणार नाही अशी सुरक्षा कवच तयार केले आहे.
औरंगजेब कबरीच्या सुरक्षेसाठी प्रशासन गंभीर असल्याचे एकंदरीत चित्र आहे. प्रशासन कुठलीही रिस्क घेण्यास तयार नाही. या अगोदर प्रशासनाने खुलताबाद शहरात औरंगजेब कबरीकडे येणारे रस्ते बँरीकेट लावून जाम केले आहे. औरंगजेब कबर बघण्यासाठी येणा-या पर्यटकांची तपासणी केली जात आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन हाय अलर्टवर असल्याचं दिसतं.