औरंगाबाद विमानतळावर सुरक्षा कर्मचारी वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 12:04 AM2018-06-13T00:04:49+5:302018-06-13T00:07:47+5:30
दहशतवादी हल्ला वा घातपात रोखण्यासह व प्रवाशांना तपासणी केंद्रावरून विनाविलंब विमानात बसता यावे, या उद्देशाने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने अतिरिक्त कर्मचारी देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. देशभरातील दहा विमानतळांवर ११०० अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी देण्यात येणार असून, यात औरंगाबाद विमानतळाचाही समावेश आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : दहशतवादी हल्ला वा घातपात रोखण्यासह व प्रवाशांना तपासणी केंद्रावरून विनाविलंब विमानात बसता यावे, या उद्देशाने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने अतिरिक्त कर्मचारी देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. देशभरातील दहा विमानतळांवर ११०० अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी देण्यात येणार असून, यात औरंगाबादविमानतळाचाही समावेश आहे.
औरंगाबाद विमानतळावर गत काही वर्षांत प्रवासी संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच घातपात वा दहशतवादी हल्ल्यांच्या संभाव्य कारणामुळे सुरक्षा व्यवस्थेत अतिरिक्त कर्मचारी देण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी औरंगाबाद विमानतळावर हायजॅकिंगचे मॉकड्रील करण्यात आले होते. आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षा यंत्रणांसह इतर यंत्रणा किती तत्पर राहू शकतात, हे पाहण्यासाठी मॉकड्रील करण्यात आले. यात औरंगाबाद विमानतळावरील मॉकड्रीलमध्ये सुरक्षा दलाच्या यंत्रणा यशस्वी ठरल्या. सध्या कार्यरत असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांवरील भार हलका होणार आहे. या सुरक्षा कर्मचाºयांमुळे आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासह प्रवाशांना तपासणी केंद्रावरून विनाविलंब विमानात बसण्यासाठी मदत होणार आहे.