कुस्तीकडे करिअर म्हणून पहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 12:29 AM2017-10-24T00:29:06+5:302017-10-24T00:29:06+5:30

कुस्ती हा खेळ वेळ घालवण्यासाठी नव्हे तर करिअर करण्यासाठी आहे. कुठल्याही खेळाला राजाश्रय मिळाल्याशिवाय त्याचा विकास होत नाही, असे प्रतिपादन माजी मंत्री आ. राजेश टोपे यांनी केले.

See wrestling as a career- Tope | कुस्तीकडे करिअर म्हणून पहा

कुस्तीकडे करिअर म्हणून पहा

googlenewsNext

राजेश टोपे : आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेचे थाटात उद्घाटन
जालना : कुस्ती हा खेळ वेळ घालवण्यासाठी नव्हे तर करिअर करण्यासाठी आहे. कुठल्याही खेळाला राजाश्रय मिळाल्याशिवाय त्याचा विकास होत नाही, असे प्रतिपादन माजी मंत्री आ. राजेश टोपे यांनी केले.
येथील रामचंद्र सांस्कृतिक क्रीडा मंडळ संचलित, श्री आर. डी. भक्त फार्मसी विद्यालयात आयोजित आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आ. कैलास गोरंट्याल यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचे संचालक प्राचार्य डॉ. प्रदीप दुबे, मत्स्योदरी महाविद्यालयाचे (अंबड) प्राचार्य डॉ.भागवतराव कटारे, उद्योजक संजय खोतकर, कुस्ती खेळातील छत्रपती पुरस्कारप्राप्त पर्वत कासुरे, जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष किशनलाल भक्त, उपाध्यक्ष लक्ष्मणराव सुपारकर, प्रा. नारायणराव शिरसाट, अ‍ॅड. सेवकचंद बाखरिया, हरिसिंग राजपूत, सूरजमामा मेघावाले, जीवनलाल डोंगरे, सीताराम पहाडिये, प्रभाकर विधाते, मारोती शिंदे आदींची उपस्थिती होती.
गोरंट्याल म्हणाले की, कुस्ती आणि येथील पहेलवानांमुळे पूर्वी छोटा कोल्हापूर म्हणून जालन्याची ओळख होती, परंतु कालांतराने कुस्तीचे आकर्षण कमी झाले. युवा पिढी आता क्रिकेट व अन्य खेळांकडे वळत आहे. प्रथम आमदार झालो तेव्हा शहरात महाराष्ट्र केसरी कुस्ती घेतली. त्यानंतर खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धा घेतली. लवकरच आपण जालन्यात हिंंद केसरी स्पर्धेचे आयोजन करू.
उद्घाटनानंतर औरंगाबाद येथील देवगिरी महाविद्यालयाची रुपाली वरधे आणि बिडकीन येथील शीतल जाधव यांच्यात पहिला सामना खेळविण्यात आला. या सामन्यात रुपालीने विजय मिळविला. स्पर्धेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत येणाºया ६८ महाविद्यालयातील २५० ते ३०० महिला व पुरूष मल्ल सहभागी झाले आहेत. यात राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील मल्लांचा सहभाग आहे. समारोप मंगळवारी होणार आहे. या स्पर्धेसाठी पंच म्हणून प्रा.मंगेश डोंगरे, प्रा.डॉ.शेखर शिरसाट, प्रा. डॉ. हंसराज डोंगरे, प्रा. डॉ. रामेश्वर विधाते, प्रा. हरिदास म्हस्के, प्रा. नितेश काबलिये हे काम पाहत आहेत. रमेश थोरवे यांनी सूत्रसंचालन केले, तर संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. दयानंद भक्त यांनी आभार मानले.

.... तो पहेलवानी डूब जायेगी
प्रास्ताविक करताना स्पर्धेचे आयोजक प्राचार्य डॉ. दयानंद भक्त यांनी ‘पानी नही आयेगा तो नदी सुख जायेगी और नये पहेलवान नही बनेंगे तो पहेलवानी डूब जायेगी’ या शेरव्दारे युवकांना कुस्तीकडे येण्याचे आवाहन केले. त्यांचे वडील स्व. चरण पहेलवान यांचे स्वप्न होते की, जालन्यातून महाराष्ट्र केसरी निर्माण व्हावा. त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गुरू रामचरण वस्ताद भक्त कुस्ती आखाड्याच्या माध्यमातून नवीन मल्ल तयार करण्याचे कार्य करीत आहेत.



 

Web Title: See wrestling as a career- Tope

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.