खरिपाच्या पूर्वतयारीसाठी कृषी विभागाचे बीज प्रात्यक्षिक कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:02 AM2021-05-12T04:02:17+5:302021-05-12T04:02:17+5:30
सोयगाव : खरिपाच्या पूर्वतयारीसाठी तालुक्यात कृषी विभाग कामाला लागला आहे. विभागाकडून विविध खरिपाच्या बियाण्यांवर बीज प्रात्यक्षिक करण्यात आले. यात ...
सोयगाव : खरिपाच्या पूर्वतयारीसाठी तालुक्यात कृषी विभाग कामाला लागला आहे. विभागाकडून विविध खरिपाच्या बियाण्यांवर बीज प्रात्यक्षिक करण्यात आले. यात सोयाबीन बीज प्रात्यक्षिकाचा प्रयोग जरंडी गावात करण्यात आला. सोयाबीन बियाण्यांचे दर वाढत आहेत. त्यामुळे बियाण्यांचा तुटवडादेखील होऊ शकतो. शेतकऱ्यांनी स्वस्तात पडणारे सोयाबीन बियाणे घरच्या घरी तयार करावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जात आहे.
लॉकडाऊनच्या काळात तालुका कृषी विभागाच्या वतीने तालुक्यात खरीप पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध मोहीम हाती घेण्यात आलेल्या आहेत. त्यात सोयाबीन पिकांची उगवण क्षमता तपासणे, सोयाबीनच्या घरच्या बियाण्यांचा वापर करणे, माती परीक्षण आधारित खते व्यवस्थापन करणे, रुंदसरी वरंबा वापर मोहीम आदी माहिती दिली जात आहे. यावेळी कृषी सहायक आरती बाविस्कर, सरपंच वंदना पाटील, सेवा संस्थेचे अध्यक्ष राजू पाटील, ग्रामपंचायत सदस्य मधुकर पाटील, बाबू नाना, ज्ञानेश्वर पाटील, अजय राजपूत, अपूर्व राजपूत, समाधान देवरे, राजेंद्र चौधरी, संजय चौधरी, सचिन महाजन यांची उपस्थिती होती.
छायाचित्र ओळ : जरंडी सोयाबीन बियाण्यांवर बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक करताना तालुका कृषी विभागाचे पथक, सरपंच वंदना पाटील व शेतकरी.
100521\1316ynsakal75-062202222_1.jpg
जरंडी येथे बीजप्रक्रियाबाबत प्रशिक्षण देताना कृषी विभागाचे अधिकारी