सीमोल्लंघनाने दसरा साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 12:46 AM2017-10-01T00:46:22+5:302017-10-01T00:46:22+5:30
विजयादशमीनिमित्त शहरातील नागरिकांनी विविध भागांमध्ये सीमोल्लंघन करुन दसºयाचा सण उत्साहात साजरा केला. एकमेकांच्या गाठीभेटी घेऊन दसºयाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : विजयादशमीनिमित्त शहरातील नागरिकांनी विविध भागांमध्ये सीमोल्लंघन करुन दसºयाचा सण उत्साहात साजरा केला. एकमेकांच्या गाठीभेटी घेऊन दसºयाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
अश्विनी शुद्ध प्रतिपदेपासून जिल्हाभरात नवरात्रोत्सव साजरा करण्यात आला. ठिकठिकाणी दुर्गादेवीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. अष्टमी आणि नवमीच्या दिवशी होम-हवन, देवीची महापूजा करण्यात आली.
दशमीच्या दिवशी या नवरात्रोत्सवाची सांगता झाली. विजयादशमी हा सण विजयाचे प्रतिक मानला जातो. शनिवारी जिल्हाभरात दसºयाचा उत्साह शिगेला पोहोचला होता. सकाळपासूनच सणाची लगबग सुरु झाली होती. व्यापारी प्रतिष्ठानांमध्ये स्वच्छता करण्यात आली. हार, फुलांच्या तोरणांनी व्यापारी प्रतिष्ठाने, घरांचे प्रवेशद्वार सजविण्यात आले. सायंकाळी ठिकठिकाणी लक्ष्मीचे पूजन करण्यात आले.
सायंकाळी ६ वाजेनंतर प्रत्यक्ष सीमोल्लंघन कार्यक्रमाला प्रारंभ झाला. येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात परंपरेनुसार सिमोल्लंघन कार्यक्रम घेतला जातो. शहरातील विविध भागातून नागरिक या ठिकाणी दाखल झाले. पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप झळके, अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय परदेसी, पोलीस उपअधीक्षक (गृह) सोमनाथ मानकर, पोलीस निरीक्षक संजय हिबारे आदींनी आलेल्या नागरिकांचे स्वागत केले. यावेळी मानाच्या दिंडीचेही स्वागत करण्यात आले. दिंडीत पारंपरिक वेशभूषेत नागरिक सहभागी झाले होते. जिल्हा पोलीस दलातील शस्त्रांचे पूजन केल्यानंतर प्रदर्शन भरविण्यात आले होते. याच भागात असलेल्या पेडा हनुमान मंदिरातही सीमोल्लंघनासाठी गर्दी झाली होती. सायंकाळी जिल्हा स्टेडियममध्ये विश्व हिंदू परिषदेच्या वतीने सामूहिक प्रार्थना घेण्यात आली. नवीन वसाहतींमध्ये ठिकठिकाणी सीमोल्लंघन करण्यात आले. शमी वृक्षाचे पूजन करुन आपट्यांची पाने देऊन दसºयाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.