काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवून ठेवलेला गहू, तांदूळ पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:02 AM2021-04-24T04:02:51+5:302021-04-24T04:02:51+5:30

घाटनांद्रा : येथे पाचोरा रस्त्यावर असलेल्या एका गोदामामध्ये काळ्या बाजारात विक्री करण्याच्या हेतूने जमा करुन ठेवलेला हजारो रुपयांचा ...

Seized wheat, rice stored for sale on the black market | काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवून ठेवलेला गहू, तांदूळ पकडला

काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवून ठेवलेला गहू, तांदूळ पकडला

googlenewsNext

घाटनांद्रा : येथे पाचोरा रस्त्यावर असलेल्या एका गोदामामध्ये काळ्या बाजारात विक्री करण्याच्या हेतूने जमा करुन ठेवलेला हजारो रुपयांचा गहू व तांदूळ सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी छापा मारुन पकडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर नारायण मोरे यांनी आपले घर शेख रहिमोद्दीन मसिओद्दीन व शेख मजलोद्दीन रफियोद्दीन (रा. शिवणा) यांना भाडेतत्त्वावर दिले होते.

येथे या व्यक्तींनी काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी साठवून ठेवलेला गहू व तांदूळ असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार विकास आडे, जमादार दयानंद वाघ, सलीम शाह, सचिन सोनार, नितीन गायकवाड, काकासाहेब सोनवणे, आदींनी येथे छापा टाकला. यात १९ गोण्या गहू व ८० गोण्या तांदूळ असा ६९ हजार २५० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. फौजदार विकास आडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फोटो : घाटनांद्रा येथे काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवून ठेवलेला गहू व तांदूळ पकडला.

230421\datta revnnath joshi_img-20210421-wa0030_1.jpg

घाटनांद्रा येथे काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवून ठेवलेला गहू व तांदूळ पकडला.

Web Title: Seized wheat, rice stored for sale on the black market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.