मालमत्ता कराच्या वसुलीसाठी जप्तीची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 10:46 PM2019-01-08T22:46:44+5:302019-01-08T22:46:57+5:30
झोन ४ कार्यालयाने हडको एन-१२ येथील आर.जे. राठी यांच्या मालकीच्या मूकबधिर व अपंग शासकीय कार्यालयाची इमारत सील करण्यात आली.
औरंगाबाद : मालमत्ता कराच्या वसुलीसाठी गुरुवार, १० जानेवारीपासून महापालिका विशेष अभियान राबविणार आहे. त्यापूर्वीच झोन ४ कार्यालयाने हडको एन-१२ येथील आर.जे. राठी यांच्या मालकीच्या मूकबधिर व अपंग शासकीय कार्यालयाची इमारत सील करण्यात आली.
एन-१२ येथे विसर्जन विहिरीजवळ आर.जे. राठी यांच्या मालकीची इमारत मूकबधिर व अपंग शासकीय कार्यालयास भाडेतत्त्वावर दिली आहे. मालमत्ताधारकाकडे ३ लाख ६६ हजार ८३८ रुपये मालमत्ता कर थकीत होता. यापूर्वी त्यांना वारंवार नोटिसा दिल्या. त्यांनी थकबाकी भरली नाही. त्यामुळे करनिर्धारक महावीर पाटणी यांच्या मार्गदर्शनाखाली वार्ड अधिकारी अजमत खान, बी.बी. बांडे, गोरख पवार, श्रीकांत वाघ, तसेच कलीमोद्दीन यांनी इमारतीला सील ठोकले.