देवगिरी महाविद्यालयाच्या २५ खेळाडूंची विद्यापीठ संघात निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 12:25 AM2017-11-24T00:25:48+5:302017-11-24T00:26:28+5:30
दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत होणाºया राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवासाठी देवगिरी महाविद्यालयाच्या २५ खेळाडूंची विद्यापीठाच्या विविध खेळांच्या संघात निवड झाली आहे.
औरंगाबाद : दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत होणाºया राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवासाठी देवगिरी महाविद्यालयाच्या २५ खेळाडूंची विद्यापीठाच्या विविध खेळांच्या संघात निवड झाली आहे.
पूजा सोळंके, मयुरी जाधव, अनिता राठोड, राधा शिंदे, पूजा शिंदे, कल्याणी सोनवणे, ज्योती देशमुख, शीतल गायकवाड, वरद कचरे हे विद्यापीठाच्या खो-खो संघाचे प्रतिनिधित्व करतील, तर मयुरी बोरुडे, श्रद्धा चव्हाण, श्रद्धा भिकणे, गौरवी कांकरिया, चैताली पाठक, काजल मुंडले, देवेंद्र देवकर, तनवीरसिंग दरोगा यांची विद्यापीठाच्या बास्केटबॉल संघात निवड झाली आहे. स्नेहल खंडागळे, विद्याराणी वजाळे, कुलदीप जाधव हे विद्यापीठाच्या कबड्डी संघाचे प्रतिनिधित्व करतील तर श्रद्धा भिकणे, स्नेहल हरदे यांची अॅथलेटिक्स आणि प्रतीक्षा सोनटक्के, प्रांजली वाघरुळकर, माधुरी ठाकूर यांची विद्यापीठाच्या व्हॉलीबॉल संघात निवड झाली आहे. या खेळाडूंना क्रीडा विभागप्रमुख डॉ. शेखर शिरसाठ, डॉ. शेखर कोठुळे, राणी पवार, इशांतराय यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या यशाबद्दल म. शि. प्र. मंडळाचे सरचिटणीस आ. सतीश चव्हाण, पंडितराव हर्षे, मोहनराव सावंत, प्राचार्य शिवाजीराव थोरे, उपप्राचार्य डॉ. अशोक तेजनकर, डॉ. सी. एस. पाटील, पंडित भोजने यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.