साहस शिबिरासाठी विद्यापीठातील दहा विद्यार्थ्यांची निवड
By Admin | Published: September 7, 2014 12:47 AM2014-09-07T00:47:06+5:302014-09-07T00:53:36+5:30
औरंगाबाद : हिमाचल प्रदेश येथील स्वर्गश्रम येथे होणाऱ्या राष्ट्रीय साहस शिबिरासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या दहा विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
औरंगाबाद : हिमाचल प्रदेश येथील स्वर्गश्रम येथे होणाऱ्या राष्ट्रीय साहस शिबिरासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या दहा विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
साहस शिबिरात दहा दिवस दोराच्या साहाय्याने पर्वत सर करणे, बर्फाळ प्रदेशातून चालणे, आपत्ती व्यवस्थापनाविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळणार आहे. शिबिरासाठी निवडण्यात आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये गणेश चव्हाण, ज्ञानेश्वर बोंबले, शंभुराजे टेंभे, सुदाम छानदार, पवन येवले, प्रतीक्षा खांडेभराड, अश्विनी येवले, रेखा गायकवाड, पूजा साखरे, प्रतिभा मुळे या दहा विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
संघ व्यवस्थापक प्रा.सुशीला सोलापुरे व प्रा. अर्जुन मोरे हे निवड झालेल्या संघासोबत मंगळवारी हिमाचल प्रदेशकडे रवाना
झाले.
यावेळी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे व कुलसचिव डॉ. धनराज माने यांनी संघाला शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी ‘बीसीयूडी’चे संचालक डॉ. कारभारी काळे, परीक्षा नियंत्रक डॉ. सुरेश गायकवाड, वित्त व लेखाधिकारी डॉ. सय्यद अझरुद्दीन, डॉ. राजेश करपे, डॉ. संतोष यशवंतकर, प्रा. एस. बी. भणगे आदी उपस्थित होते.