स्वत:चेच बचत गट, स्वत:लाच कर्ज ; यशस्विनी पतसंस्थेचा ४८ कोटींचा घोटाळा, २११ तक्रारी प्राप्त

By सुमित डोळे | Published: November 3, 2023 07:09 PM2023-11-03T19:09:41+5:302023-11-03T19:09:52+5:30

तपासाचा वेग मंदावल्याने ठेवीदार चिंतेत

Self-help group, self-loan; 48 crore scam of Yashaswini credit institution, 211 complaints received | स्वत:चेच बचत गट, स्वत:लाच कर्ज ; यशस्विनी पतसंस्थेचा ४८ कोटींचा घोटाळा, २११ तक्रारी प्राप्त

स्वत:चेच बचत गट, स्वत:लाच कर्ज ; यशस्विनी पतसंस्थेचा ४८ कोटींचा घोटाळा, २११ तक्रारी प्राप्त

छत्रपती संभाजीनगर : आदर्श नागरी पतसंस्थेचा मुख्य व्यवस्थापक देवीदास सखाराम अधाने (रा. नवजीवन कॉलनी, एन-११) याच्या यशस्विनी महिला स्वयंसहाय्यता गट सहकारी पतसंस्थेतही ४७ कोटी ८२ लाखांचा घोटाळा निष्पन्न झाला. मात्र, गुन्हा दाखल होऊन २२ दिवस उलटले तरी सततच्या कायदा व सुव्यवस्थेच्या बंदोबस्तामुळे या प्रकरणाचा तपास मंदावल्याने ठेवीदारांची चिंता वाढली आहे. ‘आदर्श’प्रमाणेच यातही आर्थिक गुन्हे शाखेकडे याचा तपास देऊन पैसे परत देण्याची प्रक्रिया वेगाने करण्याची मागणी आता ठेवीदार करत आहेत.

अधानेसह सिडको पोलिस ठाण्यात पत्नी, मुलासह एकूण १५ जणांवर ८ ऑक्टोबर रोजी घोटाळ्याचा गुन्हा दाखल झाला. या पतसंस्थेद्वारे १५ पेक्षा अधिक बचत गटांद्वारे २८ कोटी ८१ लाखांचे कर्ज उचलले. ३१ मार्चच्या ताळेबंदानुसार १२ कोटी ९७ लाख २४ हजार ९९२ रुपयांची गुंतवणूक निदर्शनास आली. त्यापैकी ५७ टक्के म्हणजेच ७ कोटी ४० लाखांची गुंतवणूक इतरत्र नियमबाह्य वळवली गेली.

स्वत:चेच बचत गट; स्वत:लाच कर्ज 
२०१४ पासून २०२२ पर्यंत ‘यशस्विनी’मधून त्यांनी १९ कोटींचे विनातारण कर्ज वाटत स्वत:च्याच अन्य संस्थेत वळते केले. अन्य महिलांच्या नावे स्वत:च बचत गट स्थापन त्याच्यावर बनावट कागदपत्रांद्वारे २८ कोटी ८१ लाख ८५ हजार रुपयांचे कर्ज उचलले. पोलिसांनी यातील काही संचालकांची माहिती घेतली असता अत्यंत सर्वसाधारण, कमी शिकलेल्या महिलांना त्यांनी संचालकपदी बसवून सर्व अधिकार स्वत:कडे ठेवल्याचे दिसून आले.

पती-पत्नी अटकेत, मुलगा मात्र पसार
सिडको पोलिसांच्या पथकाने गुन्हा दाखल झाल्यापासून मुलाने घर सोडून पलायन केले आहे. एक पथकाने अधानेच्या गावाकडे जाऊनही शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. गेली काही वर्षे तोच काम पाहत होता, असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Self-help group, self-loan; 48 crore scam of Yashaswini credit institution, 211 complaints received

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.