विद्यापीठाच्या ८० विद्यार्थ्यांची केली सिरम इन्स्टिट्यूटने निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:06 AM2021-02-23T04:06:02+5:302021-02-23T04:06:02+5:30

दिलासा : कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी १९० विद्यार्थी होते उपस्थित औरंगाबाद : सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या कंपनीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर ...

Seli Institute selected 80 students of the university | विद्यापीठाच्या ८० विद्यार्थ्यांची केली सिरम इन्स्टिट्यूटने निवड

विद्यापीठाच्या ८० विद्यार्थ्यांची केली सिरम इन्स्टिट्यूटने निवड

googlenewsNext

दिलासा : कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी १९० विद्यार्थी होते उपस्थित

औरंगाबाद : सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या कंपनीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये ८० विद्यार्थ्यांची प्राथमिक निवड करण्यात आली.

या कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी एम.एस्सी. मायक्रोबायोलॉजी, बायोकेमिस्ट्री आणि बायोटेक्नॉलॉजी या विषयांचे १९० विद्यार्थी उपस्थित होते. सुरुवातीला विद्यापीठातील कोविड टेस्टिंग लॅबचे संचालक प्रा. जी. डी. खेडकर, तसेच विज्ञान शाखेचे अधिष्ठाता प्रा. बी. बी. वायकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सिरम इन्स्टिट्यूटचे एच. आर. प्रतिनिधी भूषण आपटे व चिन्मय कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांची मुलाखत घेतली. यानंतर दुसऱ्या मुलाखतीमध्ये जे विद्यार्थी पात्र ठरतील त्यांना सीरम इन्स्टिट्यूटमध्ये प्रॉडक्शन विभागामध्ये ट्रेनी या पदावर नेमणूक केली जाणार आहे. सध्या सुरू असलेल्या कोविड महामारीच्या परिस्थितीमध्ये कोविड लस उत्पादन करणाऱ्या विभागात नोकरीची संधी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी प्लेसमेंट सेलचे प्लेसमेंट अधिकारी डॉ. गिरीश काळे यांनी परिश्रम घेतले.

या प्रसंगी मास्क घालणे, वैयक्तिक अंतर राखणे, सॅनिटायझरचा वापर करणे, विद्यार्थी मुलाखतीस येताना तापमान तपासणे, आदी सर्व नियमांचे पालन करण्यात आले. सिरम इन्स्टिट्यूट तर्फे एच. आर. विभागातील भूषण आपटे, चिन्मय कुलकर्णी, नवल बसौले आणि तांत्रिक विभागाचे आशुतोष खत्री, दिनेश गेहलोत, अमोल लड्डा, उमाकांत पुंडे, सुहास बुरांडे, रोहन दिघे, तर विद्यापीठातील कोविड लॅबचे संचालक प्रा. जी. डी. खेडकर, तसेच विज्ञान शाखेचे अधिष्ठाता प्रा. बी. बी. वायकर व प्लेसमेंट सेलचे डॉ. गिरीश काळे उपस्थित होते.

Web Title: Seli Institute selected 80 students of the university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.