बारावी सायन्सच्या विद्यार्थी-पालकांसाठी सेमिनार
By Admin | Published: December 21, 2015 11:41 PM2015-12-21T23:41:09+5:302015-12-22T00:07:59+5:30
औरंगाबाद : बारावीचे वर्ष म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनाला कलाटणी देणारे वर्ष. बारावीच्या विद्यार्थ्यांबरोबरच त्यांच्या पालकांनाही काळजी वाटत असते;
औरंगाबाद : बारावीचे वर्ष म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनाला कलाटणी देणारे वर्ष. बारावीच्या विद्यार्थ्यांबरोबरच त्यांच्या पालकांनाही काळजी वाटत असते; विशेष करून बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांच्या पालकांना. आपल्या पाल्याला उत्तम गुण मिळून चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा ही पालकांची चिंता वजा अपेक्षा असते. त्यासाठी केवळ अभ्यासच नाही तर परीक्षांचे स्वरूप ओळखून तयारी करणे गरजेचे आहे.
यावर्षीपासून इंजिनिअरिंग व मेडिकल अॅडमिशन उएळ च्या आधारावर होणार आहेत. परीक्षांमध्ये झालेल्या या बदलानुरूप अभ्यास तंत्र आणि पालक-विद्यार्थ्यांना याविषयी योग्य मार्गदर्शन करण्यासाठी ‘लोकमत’तर्फे व उएळ रूङ्म१ी इङ्मङ्म२३ी१ विद्यालंकार यांच्या सौजन्याने ऌरउ+उएळ यशाचा फॉर्म्युला’ सेमिनारचे आयोजन २५ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता तापडिया नाट्यमंदिर, निरालाबाजार येथे करण्यात आले आहे. या सेमिनारमध्ये बारावी सायन्सचे विद्यार्थी व पालकांना पडणाऱ्या सर्व प्रश्नांची तज्ज्ञांकडून उत्तरे व मार्गदर्शन मिळणार आहे. जसे सीईटीची तयारी कशी करायची, तिचे स्वरूप कसे असणार, बोर्ड आणि सीईटीच्या अभ्यासाचा ताळमेळ कसा घालायचा यासारखे अनेक प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना असू शकतात. बरेच विद्यार्थी सीईटीच्या अभ्यासाला जास्त महत्त्व देतात. मग त्यांना बोर्डाचे पेपर कसे सोडवायचे हे माहीत नसते. सीईटी इतकेच बोर्डाच्या परीक्षेलाही खूप महत्त्व आहे. दोहोंचाही पूरक अभ्यास कसा करायचा याचे तंत्र तज्ज्ञांकडून जाणून घेण्याची नामी संधी ऌरउ+उएळ यशाचा फॉर्म्युला’ सेमिनारमध्ये मिळणार आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये बदलले परीक्षांचे स्वरूप आणि वाढती स्पर्धा, यामुळे विद्यार्थ्यांना फक्त अभ्यास करून चालणार नाही. विद्यार्थ्यांना केवळ बोर्डाचे पेपर नाही तर सीईटी, जेईई मेन्स व अॅडव्हान्स, एमबीबीएस सीईट आणि इतर अनेक प्रवेश परीक्षांना सामोरे जावे लागते. सुरुवातीला आयआयटीसाठी जेईई, एनआयटीसाठी एआयईईई आणि राज्यातील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी सीईटी द्यावी लागत असे. मात्र, दोन वर्षांपासून जेईई मेन्स व अॅडव्हान्स या आधारेच इंजिनिअरिंगचे प्रवेश दिले जाऊ लागले. त्यानुसार विद्यार्थी अभ्यास करू लागले. मात्र यंदा पुन्हा सीईटीच्या आधारावरच इंजिनिअरिंग व मेडिकलचे प्रवेश दिले जाणार असल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास पद्धतीत थोडे बदल करावे लागणार आहेत. हे बदल नीट समजावून सांगण्यासाठी ‘लोकमत’ने हा कार्यक्रम आयोजित केला आहे.
ढँ८२्रू२, उँीे्र२३१८, ठ४ेी१्रूं’२ झटपट कशी सोडवावी, सीईटीचे प्रश्न क्षणात सोडविण्याच्या टिप्स आणि ट्रिक्सही विद्यार्थ्यांना सेमिनारमध्ये जाणून घेता येणार आहेत. त्यामुळे सर्व बारावी सायन्सच्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी सेमिनारमध्ये नोंदणी करावी. कार्यक्रमस्थळी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य देण्यात येईल.