आणखी एका शाळकरी मुलीची वेणी कापल्याने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2017 12:56 AM2017-09-05T00:56:59+5:302017-09-05T00:56:59+5:30

पडेगाव परिसरातील कोमलनगरातील बंद घरात झोपलेल्या मुलीची वेणी कापलेली आढळली. वेणी कापण्याची शहरातील ही चौथी घटना आहे

Sensing another brochure for a girl child | आणखी एका शाळकरी मुलीची वेणी कापल्याने खळबळ

आणखी एका शाळकरी मुलीची वेणी कापल्याने खळबळ

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : पंधरा दिवसांपासून शहरात वेणी कापण्याचे सुरू झालेले प्रकार थांबायला तयार नाहीत. पडेगाव परिसरातील कोमलनगरातील बंद घरात झोपलेल्या मुलीची वेणी कापलेली आढळली. वेणी कापण्याची शहरातील ही चौथी घटना आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली; मात्र रात्री उशिरापर्यंत तक्रार करण्यासाठी मुलीचे कुटुंब पुढे आले नव्हते.
उत्तर भारतातील अनेक ठिकाणी वेणी कापण्याच्या घटना घडल्याच्या बातम्या टीव्ही चॅनल्सवर झळकल्या होत्या. या बातम्यांची चर्चा सुरू असताना १८ आॅगस्टला छावणीच्या आठवडी बाजारात महिलेची अर्धी वेणी कापण्याची पहिली घटना घडली. यानंतर रेल्वेस्टेशन परिसरातील जहागीरदार कॉलनी आणि शहानूरमिया दर्गा परिसरातील शम्सनगर येथील दोन मुलींचे झोपेतच कोणीतरी केस कापले. विशेष म्हणजे या दोन्ही घटना घर आतून बंद असताना घडल्या. विशेष म्हणजे त्यावेळी घरात त्यांचे नातेवाईकही उपस्थित होते. अशीच घटना पडेगावमधील कोमलनगरात ४ सप्टेंबर रोजी रात्री अनिल निंभोरे यांच्या घरात घडली. निंभोरे हे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम करतात. त्यांना १६ वर्षांचा मुलगा आणि १३ वर्षांची ८ वीमध्ये शिकणारी मुलगी आहे. रविवारी रात्री नेहमीप्रमाणे घर आतून बंद करून निंभोरे कुटुंब झोपले. सोमवारी सकाळी झोपेतून जागे झाले तेव्हा मुलीची वेणी कापलेली दिसली. वेणीचे केस जमिनीवर पडलेले पाहून निंभोरे कुटुंबियांना धक्काच बसला. त्यांचे घर आणि खिडक्या आतून बंद होत्या. बाहेरून कोणीही माणूस आत आला नाही, असे असताना मुलीचे केस कापण्यात आले होते. ही बाब कळताच छावणी पोलीस ठाण्याचे निरीक्षक इंदलसिंग बहुरे आणि कर्मचाºयांनी कोमलनगरात जाऊन निंभोरे कुटुंबाकडून घटनेची माहिती जाणून घेतली. तक्रार करण्यासाठी ठाण्यात बोलविले होते.

Web Title: Sensing another brochure for a girl child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.