विशेष मुलांसाठी तयार झाले सेन्सरी गार्डन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:05 AM2021-03-21T04:05:17+5:302021-03-21T04:05:17+5:30
विशेष मुलांच्या दृष्टीने असे एकही गार्डन आजवर शहरात नव्हते. त्यामुळे बगिच्यात जाऊन तेथील विविध खेळणी खेळण्याचे स्वप्न त्यांच्यासाठी स्वप्नच ...
विशेष मुलांच्या दृष्टीने असे एकही गार्डन आजवर शहरात नव्हते. त्यामुळे बगिच्यात जाऊन तेथील विविध खेळणी खेळण्याचे स्वप्न त्यांच्यासाठी स्वप्नच रहायचे. म्हणूनच विशेष मुलांचा आनंद लक्षात घेऊन स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मदतीने गार्डनची निर्मिती करण्यात आली आहे, असे शाळेच्या संचालिका आदिती शार्दूल यांनी सांगितले.
या गार्डनमधील खेळणी मुलांच्या ज्ञानेंद्रियांचा विकास करणारी आहेत. एकूण १० प्रकारची खेळणी असून, काही खेळणी विशेष मुले आणि सामान्य मुले यांना एकत्रित खेळता येण्यासारखी आहेत.
एसबीआयचे डीजीएम अलोककुमार चतुर्वेदी व रवीकुमार वर्मा, एजीएम रमेश हिंगू व सुधा प्रकाश, डीएम दत्तप्रसाद पवार व प्रताप हंदराले, डॉ. दिवाकर कुलकर्णी, डॉ. सुहास आजगावकर, डॉ. संजीव सावजी, डॉ. दीपक भिसेगावकर, अदिती शार्दूल यांच्या उपस्थितीत गार्डनचे औपचारिक उद्घाटन झाले.
चौकट :
विहंग शाळेच्या आवारात हे गार्डन असले तरी सर्वच विशेष मुले आणि सामान्य मुलांसाठी हे गार्डन खुले असणार आहे. फक्त सध्या कोरोनाच्या निर्बंधांमुळे गार्डन बंद आहे. विशेष मुलांना त्यांच्या व्हीलचेअरसह आणि कोणाच्याही मदतीशिवाय येथील खेळणी मुक्तपणे खेळता येतील. औरंगाबादचेच नव्हे तर मराठवाड्यातले हे पहिलेच विशेष मुलांसाठी बनविलेले गार्डन आहे. व्हीलचेअर स्विंग, व्हीलचेअर मेरी गो राऊंड, सेन्सरी वॅाक अशी विविध खेळणी विशेष मुलांचा आनंद द्विगुणित करणारी ठरतील.
- आदिती शार्दूल
फोटो ओळ :
विशेष मुलांसाठी तयार करण्यात आलेले सेन्सरी गार्डन.