सप्टेंबरमध्ये पीएच.डी. प्रवेशपूर्व परीक्षा
By Admin | Published: May 1, 2016 01:30 AM2016-05-01T01:30:17+5:302016-05-01T01:42:37+5:30
औरंगाबाद : पीएच.डी. प्रवेशपूर्व परीक्षा (पेट) व्यवस्थापन परिषदेत मंजूर झाल्याची माहिती कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी शुक्रवारी दिली.
औरंगाबाद : पीएच.डी. प्रवेशपूर्व परीक्षा (पेट) सप्टेंबर २०१६ मध्ये घेण्याचा ठराव डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेत मंजूर झाल्याची माहिती कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी शुक्रवारी दिली.
व्यवस्थापन परिषदेची २८ व २९ एप्रिल रोजी बैठक होऊन विविध निर्णय घेण्यात आले. बैठकीस सदस्य सचिव तथा कुलसचिव डॉ. मुरलीधर लोखंडे, बीसीयूडी संचालक डॉ. के. व्ही. काळे, वित्त व लेखाधिकारी डॉ. सय्यद अझरुद्दीन व परीक्षा नियंत्रक डॉ. डी. एम. नेटके यांची उपस्थिती होती. परिषदेत एकूण ३२ विषयांवर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले. बैठकीतील महत्त्वाचे निर्णय पुढीलप्रमाणे : शिक्षणशास्त्र व क्रीडा विभागात एनसीटीईच्या नियमाप्रमाणे पद निर्माण करण्यासाठी समिती गठीत. डॉ. पी. आर. गायकवाड, डॉ. प्रदीप दुबे व डॉ. अझरुद्दीन यांचा समितीत समावेश, सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षासाठी नवीन महाविद्यालयांसाठीच्या ४९ पैकी १९ प्रस्तावांना शासनाकडे पाठविण्यासाठी मान्यता, परीक्षा केंद्र, परिवेक्षण, केंद्र बदलणे, छपाई यासंदर्भात अध्यादेश तयार करण्यासाठी डॉ. दिलीप खैरनार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत. डॉ. साधना पांडे, डॉ. डी. एम. नेटके, डॉ. अझरुद्दीन, गुलाब नागे आदींचा समावेश, हॉटेल मॅनेजमेंट व केटरिंग टेक्नॉलॉजी हा नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी मान्यता, उन्हाळी सुट्ट्यांमध्ये गरजू विद्यार्थ्यांना विभागप्रमुखांच्या मान्यतेने वसतिगृहात राहण्यासाठी मान्यता, भारतीय संविधान या विषयावर राष्ट्रीय परिषदेसाठी ३ लाखांचा निधी मंजूर.