मुक्तार्इंच्या पालखीची २५० वर्षांपासून बीडकरांकडून सेवा

By Admin | Published: June 19, 2017 11:41 PM2017-06-19T23:41:10+5:302017-06-19T23:45:57+5:30

बीड : आषाढी वारीसाठी मुक्ताईनगर येथून निघालेली संत मुक्ताबार्इंची पालखी मंगळवारी बीड शहरात येत आहे.

Service from Beedkar for 250 years of Muktiarai Palkhi | मुक्तार्इंच्या पालखीची २५० वर्षांपासून बीडकरांकडून सेवा

मुक्तार्इंच्या पालखीची २५० वर्षांपासून बीडकरांकडून सेवा

googlenewsNext

अनिल भंडारी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : आषाढी वारीसाठी मुक्ताईनगर येथून निघालेली संत मुक्ताबार्इंची पालखी मंगळवारी बीड शहरात येत आहे. ३०८ वर्षांची परंपरा असलेली ही पालखी बीडकरांच्या श्रद्धेची, भावनेची आणि अस्मितेची बनली आहे. पालखीचे आगमन आणि प्रस्थानावेळी बीडमध्ये वरुणराजा स्वागत करतो अशी अनुभूती भाविकांना आलेली आहे. मुक्ताईच्या पदस्पर्शाने बीडनगरी धन्य होते.
आदिशक्ती संत मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष भैय्यासाहेब, अ‍ॅड. रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रवींद्र महाराज हरणे यांच्या नेतृत्वात हा पालखी सोहळा सुरू होतो. मजल-दरमजल करीत टाळ-मृदंगाच्या गजरात पालखीचा ३३ दिवस प्रवास सुरू असतो. सुधाकर पाटील हे पालखी मार्गावरील व्यवस्थेची जबाबदारी सांभाळतात. बीड येथील माळीवेस हनुमान मंदिरात कितीतरी वर्षांपासून पालखी मुक्कामाची परंपरा आहे. संत मुक्ताई पालखीचे आगमन बीडच्या भाविकांसाठी जणू दसरा, दिवाळी असते. अनेक महिला भगिनी नवस फेडण्यासाठी आदिशक्ती मुक्ताईची खणा, नारळाने ओटी भरतात. नवसपूर्तीचा आनंदही अनेक भाविकांमध्ये पहायला मिळतो.
हनुमान मंदिर विश्वस्तांच्या वतीने पालखीच्या एक दिवस मुक्कामाची निवास आणि भोजन व्यवस्था केली जाते. त्यानंतर पालखी शहरातील बालाजी मंदिराकडे प्रस्थान होते. तेथे पालखीचा मुक्काम असतो. नंतर पालखी पालीच्या दिशेने प्रस्थान करते. हनुमान मंदिर विश्वस्त मंडळाचे शांतीलाल पटेल, चंद्रकांत पाटील, विश्वासराव मनसबदार, अ‍ॅड. प्रसाद मनसबदार, संपतराव मारकड, सुरेश नहार, राजाभाऊ बाहेगव्हाणकर, लक्ष्मणराव जाधव, रमेश पाटील यांच्यासह भक्तमंडळी वारकरी भाविकांचे आदिरातिथ्य करतात. हनुमान मंदिर ट्रस्ट, रोटरी क्लब आॅफ बीड सिटीच्या वतीने वारकऱ्यांची आरोग्य तपासणी केली जाते. डॉक्टरांची ‘निमा’ संघटना तसेच महाबली सेवा परिवाराचा यात सहभाग असतो. याशिवाय शहरातील विविध सामाजिक संघटना आणि भाविकांच्या वतीने वारकऱ्यांची काळजी घेतली जाते.

Web Title: Service from Beedkar for 250 years of Muktiarai Palkhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.