खाजगी फोरजीच्या कामांमुळे सेवा ठप्प

By Admin | Published: July 1, 2014 11:19 PM2014-07-01T23:19:27+5:302014-07-02T00:26:11+5:30

जालना : शहरात बीएसएनएलची सेवा वारंवार ठप्प होत आहे.

Service jam due to the works of the private physician | खाजगी फोरजीच्या कामांमुळे सेवा ठप्प

खाजगी फोरजीच्या कामांमुळे सेवा ठप्प

googlenewsNext

जालना : शहरात बीएसएनएलची सेवा वारंवार ठप्प होत आहे. विशेष म्हणजे खाजगी कंपन्यांनी फोर जी सेवा देण्यासाठी केलेल्या खोदाकामात बीएसएनएलचे केबल ठिक ठिकाणी तुटल्याने शासकीय सेवेचे तीन तेरा वाजले आहेत. यामुळे दूरध्वनीसोबतच इंटरनेट सेवाही वारंवार खंडित होत आहे.
शहरातील विविध भागात काही खाजगी कंपन्यांकडून फोरजी सेवा देण्यासाठी रस्ते खोदण्यात येत आहे.यामुळे बीएसएनएलची केबल सारखी तुटत आहे.
परिणामी सेवा वारंवार विस्कळीत होत आहे. संपर्क साधणे जिकिरीचे बनले आहे. केबल तुटल्याने इंटरनेट सेवा बंद होत आहे. शासकीय कार्यालये, खाजगी कार्यालये, बँका आदी ठिकाणची इंटरनेट बंद होत असल्याने सेवांवर बंद पडत आहेत.
भोकरदन नाका, देहडकरवाडी परिसर, औरंगाबाद रोड, कचेरी रोड आदी भागात खाजगी कंपन्यांनी फोर जी सेवा सुरु करण्यासाठी केबल अंथरण्यासाठी खोदकाम सुरु केलेले आहे.
पूर्वसूचना देणे गरजेचे
ज्या ठिकाणी खाजगी कंपन्या खोदकाम करणार आहेत, त्याची पूर्वसूचना बीएसएनएला पूर्व सूचना देणे गरजेचे आहे. असे असले तरी खाजगी कंपन्या या प्रकाराकडे कानाडोळा करीत आहेत. यामुळे बीएसएनएलची दूरध्वनी व इंटरनेट सेवा खंडित होत आहे.

Web Title: Service jam due to the works of the private physician

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.