सामंजस्याने वाद मिटवा : न्या. वाघ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:04 AM2021-09-19T04:04:57+5:302021-09-19T04:04:57+5:30
विधि सेवा समिती व वकील संघ पैठण यांच्या संयुक्त विद्यमाने, टाकळी अंबड येथे ‘कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर’ घेण्यात आले. या ...
विधि सेवा समिती व वकील संघ पैठण यांच्या संयुक्त विद्यमाने, टाकळी अंबड येथे ‘कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर’ घेण्यात आले. या वेळी व्यासपीठावर न्या. एस.आर. गुळवे यांची उपस्थिती होती.
न्यायमूर्ती वाघ पुढे म्हणाले की, न्यायालयात अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. दररोज फक्त मर्यादित प्रकरणे घेतली जातात. त्यामुळे वाद आपआपसात मिटविले पाहिजेत. २५ सप्टेंबर रोजी आयोजित लोकअदालतीत जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. पांडुरंग वाकडे यांनी केले. कार्यक्रमाला वकील संघाचे अध्यक्ष ॲड. सय्यद मझहर, सचिव ॲड. सदाशिव जाधव, ॲड. पी.के. वाकडे, ॲड. स्वप्निल उगले, ॲड. प्रताप वाकडे, न्यायालयीन कर्मचारी आर.बी. कुरे, उपसरपंच अमोल नरके, चेअरमन विष्णू वाकडे आदींची उपस्थिती होती.