सातशे अभियंत्यांची पदे संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 12:18 AM2017-12-02T00:18:00+5:302017-12-02T00:18:05+5:30

महापारेषणने मंजूर केलेल्या नवीन आकृतिबंधानुसार अभियंत्यांच्या तब्बल ७०० जागा कमी होणार आहेत. कोणत्याही संघटनेला विश्वासात न घेता नवीन आकृतिबंधाची एकतर्फी अंमलबजावणी केल्यामुळे सबॉर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशनच्या वतीने राज्यभरातील महापारेषण, महावितरण व महानिर्मितीच्या परिमंडळ, मंडळ, विभागीय कार्यालये व उपकेंद्रांसमोर द्वारसभा घेऊन प्रस्तावित आकृतिबंधाची होळी करण्यात आली.

 Seven engineers are in crisis | सातशे अभियंत्यांची पदे संकटात

सातशे अभियंत्यांची पदे संकटात

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महापारेषणने मंजूर केलेल्या नवीन आकृतिबंधानुसार अभियंत्यांच्या तब्बल ७०० जागा कमी होणार आहेत. कोणत्याही संघटनेला विश्वासात न घेता नवीन आकृतिबंधाची एकतर्फी अंमलबजावणी केल्यामुळे सबॉर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशनच्या वतीने राज्यभरातील महापारेषण, महावितरण व महानिर्मितीच्या परिमंडळ, मंडळ, विभागीय कार्यालये व उपकेंद्रांसमोर द्वारसभा घेऊन प्रस्तावित आकृतिबंधाची होळी करण्यात आली.
अभियंत्यांची पदे कपात केल्यास महापारेषणचे होणारे नुकसान, मनुष्यबळावर येणारा अतिरिक्त ताण, यंत्रणेवर व वीज पुरवठ्यावर होईल, ही बाब सबॉर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशनने कंपनीच्या निदर्शनास आणून दिली होती. प्रशासनालाही ते मान्य होते. असे असले तरी कंपनी प्रशासनाने मनुष्यबळ कपातीचा आकृतिबंध मान्य केला. औरंगाबाद महापारेषण कार्यालयासमोरील आंदोलनात संघटनेचे सचिव अतुल राठोड, अनिल महिंद्रकर, अविनाश चव्हाण आदींनी मार्गदर्शन केले.

Web Title:  Seven engineers are in crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.