शिक्षकाचे घर फोडून सात तोळे सोने लंपास
By Admin | Published: May 21, 2016 11:36 PM2016-05-21T23:36:08+5:302016-05-22T00:06:43+5:30
बीड : शिक्षकाचे बंद घर फोडून चोरांनी सात तोळे दागिने लंपास केले. ही घटना बलभीमनगर भागात घडली. याप्रकरणी शुक्रवारी शहर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
बीड : शिक्षकाचे बंद घर फोडून चोरांनी सात तोळे दागिने लंपास केले. ही घटना बलभीमनगर भागात घडली. याप्रकरणी शुक्रवारी शहर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
रवींद्र ज्ञानोबा देवगावकर असे त्या शिक्षकाचे नाव असून ते बार्शी नाका भागातील जि.प. शाळेत कार्यरत आहेत. त्यांचे किल्ला मैदान, बलभीमनगरात स्वत:चे घर आहे. त्यांची मुले लातूर येथे शिक्षण घेतात. त्यांना भेटण्यासाठी ते पत्नीसमवेत गेले होते. बंद घर पाहून चोरांनी कुलूप तोडून प्रवेश केला. कपाटातील सात तोळे दागिने व रोख दीड हजार रुपये असा एक लाख ७९ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. घर उघडे असल्याचे मित्राकडून कळाल्यानंतर घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी देवगावकर यांच्या फिर्यादीवरुन शहर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. श्वानपथक पाचारण केले होते; परंतु माग काढता आला नाही. तपास जमादार अशोक सोनवणे हे करत आहेत. (प्रतिनिधी)