अपघातप्रकरणी चालकास सात वर्षाची सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2016 12:27 AM2016-11-14T00:27:41+5:302016-11-14T00:25:27+5:30

लातूर :अपघातात तिघांच्या मरणास कारणीभूत ठरल्याप्रकरणी एका ट्रकचालकास सात वर्षाची सक्तमजुरी आणि ५३ हजारांचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.

Seven years of forced labor for accident | अपघातप्रकरणी चालकास सात वर्षाची सक्तमजुरी

अपघातप्रकरणी चालकास सात वर्षाची सक्तमजुरी

googlenewsNext

लातूर : शहरातील औसारोडवरील अपघातात तिघांच्या मरणास कारणीभूत ठरल्याप्रकरणी एका ट्रकचालकास सात वर्षाची सक्तमजुरी आणि ५३ हजारांचा दंड अशी शिक्षा लातूर जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश महेश जाधव यांनी शनिवारी ठोठावली आहे.
लातूर शहरातील औसा रोडवर ९ मार्च २०१३ रोजी फिर्यादी लक्ष्मण केंद्रे हे आपल्या साथीदारांसह अवैध वाहतुकदारांविरुध्द खटले दाखल करण्यासाठी गेले असता, आरोपी ट्रकचालक गोविंद दुर्गाप्पा दंडगुले (रा. समता नगर औसा) याने आपल्या ताब्यातील ट्रक (के. ए. २३/ ५००९) हयगव व निष्काळजीपणे भरधाव चालवत लातूर-औसा मार्गावरील काळी-पिवळी जीपला धडक देऊन प्रवाशाला जखमी केले.
पुढे रस्त्याच्या डाव्या बाजूस उभे असलेल्या पोलीस जीपला धडक दिली. कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी खंडागळे, महिला पोलीस कर्मचारी भारती यांना जोराची धडक दिल्याने ते या अपघातात जागीच ठार झाले.
तर पुढे ट्रकचालकाने मोटारसायकलवरुन जात असलेल्या राजू शंकर भारस्कर (८, रा. तुळजाभवानी नगर लातूर) यालाही या ट्रकचालकाने दिलेल्या धडकेत जागीच ठार झाला.या मोटारसायकलला ट्रकने सव्वाशे फुटापर्यंत फरफटत नेले. सदर अपघातात तिघे ठार झाल्याप्रकरणी आरोपी ट्रकचालक गोविंद दुर्गाप्पा दंडगुले (रा. समता नगर औसा) याला सात वर्षाची सक्तमजुरी आणि ५० हजारांचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.

Web Title: Seven years of forced labor for accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.