पतीस सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

By Admin | Published: March 20, 2016 12:27 AM2016-03-20T00:27:40+5:302016-03-20T00:50:49+5:30

माजलगाव: लग्नानंतर अवघ्या आठ दिवसांत पत्नीचा छळ करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी येथील जिल्हा व सत्र न्या. एम. व्ही.मोराळे यांनी

Seven years of hard labor education | पतीस सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पतीस सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

googlenewsNext


माजलगाव: लग्नानंतर अवघ्या आठ दिवसांत पत्नीचा छळ करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी येथील जिल्हा व सत्र न्या. एम. व्ही.मोराळे यांनी धारूर येथील विलास दशरथ इंगळे यास सात वर्षे सक्तमजुरी व ६ हजार रुपये दंडाची शिक्षा शनिवारी सुनावली.
मीनाक्षी विलास इंगळे (वय १८) असे त्या मयत विवाहितेचे नाव आहे. तिचा विवाह २० मे २०११ रोजी तिचा विवाह धारूर येथील विलास दशरथ इंगळे याच्याशी झाला होता. लग्नानंतर आठ दिवसांनी मीनाक्षी माहेरी आली. विलासने हुंड्यातील दहा हजार रुपये घेऊन ये, असा निरोप चिठ्ठीवर मजकूर लिहून पाठवला. मीनाक्षीने सासरी येतानादहा हजार रूपये आणले. मात्र यानंतरही विलासने ‘तू मला आवडत नाहीस, मी दुसरे लग्न करणार आहे’ असे म्हणत तिचा छळ सुरु केला. तसेच कार घेण्यासाठी ५० हजार रुपये आण असा तगादा त्याने सासऱ्याकडे लावला. त्याची तरतूदही सासऱ्याने केली होती. त्यानंतर २८ फेब्रुवारी २०१२ रोजी विलासने मीनाक्षीला हृदयविकाराचा धक्का बसल्याचे सांगितले. मीनाक्षीचे वडील उत्तम गिरगावकर यांनी धारुर ग्रामीण रुग्णालय गाठले तेंव्हा ती मयत असल्याचे निदर्शनास आले. गिरगावकरांनी संशय व्यक्त केल्यानंतर तिने आत्महत्या केल्याचे उघड झाले.
धारूर ठाण्यात पती विलास इंगळे, सासरा दशरथ इंगळे, सासू सुमनबाई दशरथ इंगळे, नणंद गयाबाई बोरकर, मामा सासरा अरूण बोरकर यांच्या विरूध्दगुन्हा नोंद झाला होता. दोषारोप पत्र जिल्हा व सत्र न्यायालय माजलगाव येथे दाखल झाले. सरकार पक्षाचे पुरावे ग्राह्य धरुन न्या. मोराळे यांनी विलास यास दोषी ठरवून सात वर्ष सक्त मजुरी व ६ हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. उर्वरित चौघे निर्दाेष सुटले. (वार्ताहर)

Web Title: Seven years of hard labor education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.