फर्दापुरात भीषण पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:04 AM2021-07-09T04:04:11+5:302021-07-09T04:04:11+5:30
फर्दापूर : येथील नागरिकांना कायमच पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. विशेष बाब म्हणजे जून-जुलै या पावसाच्या कालावधीत देखील नागरिकांना ...
फर्दापूर : येथील नागरिकांना कायमच पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. विशेष बाब म्हणजे जून-जुलै या पावसाच्या कालावधीत देखील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यात खासगी टँकरचालकांकडून पाणी विकत घेण्याची वेळ नागरिकांवर आली असून हकनाक आर्थिक भुर्दंडाला सामोरे जावे लागत आहे.
जगप्रसिद्ध अजिंठा लेणीच्या पायथ्याशी असलेल्या फर्दापूरवासीयांना नेहमीच पाण्यासाठी भटकंती करावी लागते. या परिसरात दरवर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने या परिसरातील जमिनीतील पाणी पातळी कमी झाली. विहिरी आटल्या गेल्या आहेत. गावाजवळून गेलेली वाघूर नदी कोरडी झालेली आहे. खासगी बोअरवेलमधून नागरिक पाण्याची गरज भागवत होते; परंतु बोअरवेल्स देखील कोरडे पडले आहेत. दोनशे लिटर पाण्यासाठी नागरिकांना खाजगी टँकरचालकांना चाळीस ते पन्नास रुपये मोजावे लागत आहेत.
080721\img20210708181604_1.jpg
फर्दापूर गावातील नागरिकांना खाजगी टॅंकरचालकांकडून पाणी घेण्याची वेळ आली आहे.