बजाजनगर-रांजणगाव रस्त्यावर सांडपाण्याचे डबके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 11:30 PM2019-03-05T23:30:47+5:302019-03-05T23:30:53+5:30

बजाजनगर-रांजणगाव रस्त्यावर नागरी वसाहत व कंपनीतील सांडपाण्याचे डबके साचले आहे. घाण पाण्यामुळे नागरिक व वाहनधारकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.

 Sewer on the Bajjnagar-Ranjangaon road | बजाजनगर-रांजणगाव रस्त्यावर सांडपाण्याचे डबके

बजाजनगर-रांजणगाव रस्त्यावर सांडपाण्याचे डबके

googlenewsNext

वाळूज महानगर : बजाजनगर-रांजणगाव रस्त्यावर नागरी वसाहत व कंपनीतील सांडपाण्याचे डबके साचले आहे. घाण पाण्यामुळे नागरिक व वाहनधारकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे स्थानिक प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.


वाळूज औद्योगिक क्षेत्रात जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगतच्या नागरी वसाहती व कंपन्या सांडपाणी उघड्यावर सोडत आहेत. बजाजनगरातील एफडीसी चौक ते रांजणगाव फाट्यापर्यंत या रस्त्यावर जागोजागी सांडपाण्याचे डबके साचले आहे. अनेक दिवसांपासून सांडपाणी साचल्याने दुर्गंधी पसरली आहे. या सांडपाण्यात मोकाट कुत्री व डुकराचा संचार वाढला आहे. सांडपाण्याला लागूनच नागरी वसाहत असल्याने लगतच्या रहिवाशांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय हा औद्योगिक क्षेत्रात जाण्याचा मुख्य मार्ग असल्याने येथून ये-जा करणाऱ्या उद्योजक व कामगारांनाही दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. घाण पाण्याची विल्हेवाट न लावल्यास नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. संबंधित प्रशासनातील अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

Web Title:  Sewer on the Bajjnagar-Ranjangaon road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Walujवाळूज