सेनगावच्या नगरसेविका तिवारी ठरल्या अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 12:24 AM2017-08-25T00:24:52+5:302017-08-25T00:24:52+5:30

येथील नगर पंचायतीच्या प्रभाक क्र. १५ च्या नगरसेविका शिल्पा निलेश तिवारी यांनी नगरपंचायत सदस्या म्हणून कर्तव्य बजावत असताना निविदा स्वीकृतीसाठी त्यांच्या पतीच्या निविदा ठराव्याच्या बाजूने मतदान केल्याच्या कारणावरून पदाचा दुरुपयोग करीत १९६५ ची कमल १६ चा भंग केला म्हणून जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी नगरसेविका तिवारी यांचे सदस्यत्व पद रद्द करण्याचा निकाल २३ आॅगस्ट रोजी दिला आहे.

 Sewerage corporator Tiwari decides to disqualify | सेनगावच्या नगरसेविका तिवारी ठरल्या अपात्र

सेनगावच्या नगरसेविका तिवारी ठरल्या अपात्र

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
सेनगाव : येथील नगर पंचायतीच्या प्रभाक क्र. १५ च्या नगरसेविका शिल्पा निलेश तिवारी यांनी नगरपंचायत सदस्या म्हणून कर्तव्य बजावत असताना निविदा स्वीकृतीसाठी त्यांच्या पतीच्या निविदा ठराव्याच्या बाजूने मतदान केल्याच्या कारणावरून पदाचा दुरुपयोग करीत १९६५ ची कमल १६ चा भंग केला म्हणून जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी नगरसेविका तिवारी यांचे सदस्यत्व पद रद्द करण्याचा निकाल २३ आॅगस्ट रोजी दिला आहे.
येथील नगरसेविका शिल्पा नीलेश तिवारी यांच्याविरोधात गंगाधर सदाशिव गाढवे, गणेश तुकाराम जारे, पंडित साहेबराव ढाकणे (रा. सेनगाव) यांनी तक्रार दिली होती. नगर पंचायत सेनगाव येथील नगरसेविका तिवारी व त्यांचे पती यांनी संगनमत करून निविदा टेंडर प्रक्रियेत भाग घेतल्याबद्दल महाराष्टÑ नगरपालिका, नगर पंचायत मुंबई अधिनियम १९६५ कलम ४२ नुसार त्यांचे सदस्यत्व पद रद्द करण्याचा अर्ज जिल्हाधिकारी यांच्याकडे केला होता. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात दोन्ही बाजू तपासल्या. अर्जदार- गैरअर्जदार व न.प.चे मुख्याधिकारी यांनी सादर केलेल्या अहलावरून नगरसेविका तिवारी यांनी कर्तव्य बजावत असताना निविदा स्वीकृतीसाठी त्यांच्या पतीच्या बाजूने ठराव क्र. ७७ मध्ये मतदान केले. त्यांचे हे कृत्य पदाचा दुरुपयोग करणारे असल्याने जिल्हाधिकारी भंडारी यांनी त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा निकाल दिला आहे.

Web Title:  Sewerage corporator Tiwari decides to disqualify

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.