पोटच्या मुलींसोबत अश्लील चाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 01:23 AM2018-02-21T01:23:45+5:302018-02-21T01:23:52+5:30
वडील व मुलीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना बजाजनगरात उघडकीस आली. पित्याचा अन्याय गेली पाच वर्षे सहन करणा-या बापाची वाईट नजर लहान बहिणीवरही पडली. लहान बहिणीला वाचविण्यासाठी मोठ्या बहिणीने अश्लील चाळे करणा-या जन्मदात्याविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाळूज महानगर : वडील व मुलीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना बजाजनगरात उघडकीस आली. पित्याचा अन्याय गेली पाच वर्षे सहन करणा-या बापाची वाईट नजर लहान बहिणीवरही पडली. लहान बहिणीला वाचविण्यासाठी मोठ्या बहिणीने अश्लील चाळे करणा-या जन्मदात्याविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
बजाजनगर परिसरातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी शिक्षणासाठी पुणे येथे आजी-आजोबांकडे आहे. या मुलीचे वडील (४२) हे वाळूज एमआयडीसीतील कंपनीत फिटर आहेत. पीडित मुलगी सन २०१२ व जून २०१६ मध्ये बजाजनगरात आई-वडिलांकडे राहत असताना रात्री मुलगी झोपेत असताना वडील तिच्याशी अश्लील चाळे करायचे. घाबरलेल्या मुलीने आई, आजी-आजोबांना माहिती दिली. मात्र, मुलीच्या तक्रारीकडे आईने दुर्लक्ष केल्यामुळे आरोपी अनेकदा छेड काढत असे. यानंतर काही दिवसांनी पीडित मुलगी शिक्षणासाठी पुणे येथे गेली. तेथे मुलीचा मोठा भाऊ तसेच तिचे आजी-आजोबा राहत आहेत. महिनाभरापूर्वी तिचे आई-वडील व लहान बहीण पुण्याला भेटण्यासाठी गेले होते. पुण्यात तीन ते चार दिवस राहिल्यानंतर वडील औरंगाबादला परतले, तर तिची आई व लहान बहीण काही दिवस पुण्यातच थांबल्या होत्या.
आपल्या सोबत तसेच लहान बहिणीसोबत अश्लील चाळे करणा-या वडिलांना धडा शिकविण्यासाठी मुलगी पुण्याहून वाळूज एमआयडीसीत आली. मंगळवारी (दि.२० फेब्रुवारी) तिने एमआयडीसी वाळूज पोलीस ठाणे गाठून पित्याविरुद्ध तक्रार दिली. या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार आरती जाधव या करीत आहेत.
आईसोबत पुण्याला गेलेल्या पीडित मुलीच्या लहान बहिणीने वडील तुझ्याशी अश्लील चाळे करीत होते. आता माझ्यासोबतसुद्धा तसेच करतात, असे सांगितले.
तू वडिलांविरुद्ध तक्रार न केल्यास माझ्यासोबत असा घाणेरडा प्रकार पुन्हा होईल, असे लहान बहिणीने सांगितले होते. लहान बहिणीची आपबिती ऐकून मोठ्या बहिणीने पित्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा निर्णय घेतला.