सर्वांगीण गाव विकासाचा ‘शेलवाडा’ पॅटर्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 01:04 AM2017-07-25T01:04:23+5:302017-07-25T01:08:15+5:30

जालना : लोकसहभाग आणि योग्य मार्गदर्शनामुळे काय साध्य होऊ शकते, याचा आदर्शवत पॅटर्न शेलवाडा गावाने निर्माण केला आहे.

'Shellwada' pattern of all round development of the village | सर्वांगीण गाव विकासाचा ‘शेलवाडा’ पॅटर्न

सर्वांगीण गाव विकासाचा ‘शेलवाडा’ पॅटर्न

googlenewsNext

राजेश भिसे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : लोकसहभाग आणि योग्य मार्गदर्शनामुळे काय साध्य होऊ शकते, याचा आदर्शवत पॅटर्न शेलवाडा गावाने निर्माण केला आहे. गाव व्यसनमुक्त करण्यासह नैसर्गिक पद्धतीने गावाची पाण्याची गरज पूर्ण केली आहे. परिणामी गावाचा हिशोब पारदर्शी होऊन ग्रामस्थांचे आरोग्यही सुधारले आहे. शेतीपूरक व्यवसायातून शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन त्यांची कार्यक्षमताही वाढल्याचे आढळून आले आहे.
परतूर शहराजवळ ८० उंबरठ्यांचे शेलवाडा हे गाव दुष्काळाने होरपळलेले असल्याने पाणी ही तेथील मुख्य समस्या होती. या गावातील ग्रामस्थांनी अरुणिमा फाऊंडेशनशी संपर्क साधला आणि मार्गदर्शनासह गाव विकासाच्या दृष्टीने मदत करण्याचा आग्रह धरला. त्यानंतर गावात प्रथम शास्त्रोक्त पद्धतीने जलसंधारणाची कामे घेण्यात आली. यात गुगल मॅप आणि औरंगाबादच्या रफिक झकेरिया महाविद्यालयाच्या भूगोल विभागातील प्रमुख कुलकर्णी यांच्यासह विद्यार्थ्यांची मदत घेण्यात आली. त्यानंतर आवश्यक तेथेच जलसंधारणासह साखळी बंधारे उभारण्याची कामे हाती घेण्यात आली. यासाठी लोकसहभागातून चार लाखांचा निधी संकलित करण्यात आला. याचे चांगले परिणामी दिसून आले. तसेच परिसरातील विहिरींची पाणीपातळी वाढून भूगर्भातील पातळीही वाढल्याचे दिसून आले. गाव विकासाचे मॉडेल म्हणून नावारुपास आलेल्या शिवणीचे उद्धव खेडेकर यांच्या सहकार्याने गावातील विविध भागांत बांधबंदिस्तीची कामेही करण्यात आली. त्यानंतर शेतीपूरक व्यवसायासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात आले. यासाठी गोपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी देशी गायींबाबत माहिती देण्यात आली. देशी गायीच्या दुधाचे लाभ आणि दुग्धजन्य पदार्थांचा व्यवसाय याचीही माहिती शेतकऱ्यांना दिली. यानंतर शेतीपूरक व्यवसायातून शेतकरीही आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले आहेत. परिणामी गावात गत वर्षभरात एकही शेतकरी आत्महत्या झालेली नाही.

Web Title: 'Shellwada' pattern of all round development of the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.