शेंद्रा, चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत कमी दाबाने पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 01:03 AM2018-05-28T01:03:51+5:302018-05-28T01:04:13+5:30

शेंद्रा, चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत पंधरा दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू आहे

Shendra, Chikthathana Industrial colonies getting reduced pressing water | शेंद्रा, चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत कमी दाबाने पाणी

शेंद्रा, चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत कमी दाबाने पाणी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शेंद्रा, चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत पंधरा दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू आहे. औद्योगिक वसाहतींना देण्यात येणारे पाणी शहरालगतच्या ४० हून अधिक गावांना दिले जात आहे. एमआयडीसीच्या वितरण व्यवस्थेवरून ते पाणी दिले जात आहे.
एमआयडीसीच्या चिकलठाणा, शेंद्रा, वाळूज ईएसआर, पैठण येथील जलकुंभावर टँकरने पाणीपुरवठा केला जातो आहे. औद्योगिक वसाहतींमध्ये पाण्याचा तुटवडा जाणवू लागला असून, २१ मेपासून उद्योजक संघटना एमआयडीसीसोबत बैठका घेऊन तोडगा काढण्याची मागणी करीत आहेत.
जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार एमआयडीसीने गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा. मात्र, औद्योगिक वसाहतींना पाण्याचा तुटवडा जाणवणार नाही, याचीदेखील काळजी घ्यावी, असे मत मसिआ संघटनेचे अध्यक्ष किशोर राठी यांनी व्यक्त केले. औद्योगिक वसाहतीतील प्रसाधनगृहांमध्येदेखील पाणी उपलब्ध होत नसल्यामुळे कामगारांची कुचंबणा होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
६ एमएलडी पाणीपुरवठा करण्याचा भार एमआयडीसीवर पडल्यामुळे पाणीपुरवठा विभागाला तारेवरची कसरत करावी लागते आहे. २०० हून अधिक टँकर एमआयडीसीच्या जलकुंभावरून भरले जात आहेत. रविवारी दिवसभर टँकरच्या रांगा शेंद्रा येथील जलकुंभावर होत्या. रविवारी शेंद्रा आणि चिकलठाण्यातील बहुतांश उद्योगांना कमी दाबाने पाणीपुरवठा झाला.

Web Title: Shendra, Chikthathana Industrial colonies getting reduced pressing water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.