खंडोबा मंदिराच्या दिपमाळ जिर्णोद्धारासाठी शिळा दाखल
By साहेबराव हिवराळे | Published: May 21, 2023 08:05 PM2023-05-21T20:05:44+5:302023-05-21T21:16:47+5:30
छत्रपती संभाजीनगर: सातारा येथील खंडोबा मंदिरांचे जतन, संवर्धन व परिसराचा विकास करण्यासाठी तीन टप्यात एमएसआरडीसीकडून पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली काम ...
छत्रपती संभाजीनगर: सातारा येथील खंडोबा मंदिरांचे जतन, संवर्धन व परिसराचा विकास करण्यासाठी तीन टप्यात एमएसआरडीसीकडून पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली काम होत आहे. मंदिराचे जिर्णोद्धार,जतन, संवर्धन करणे यासाठी मंदिर परिसरात दिपमाळ जिर्णोद्धार साठी सामुग्री (शिळा ) दाखल करण्यात आल्याने व प्रत्यक्षात मंदिराचा विकास होणार असल्याने मंदिर ट्रस्टी व भाविकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण आहे.
अहिल्यादेवी होळकर यांच्या काळात हेमांडपंथी खंडोबा मंदिर परिसराचा जिर्णोद्धार झालेला आहे. त्यांतर शासनाच्या वतीने मंदिराच्या विकास कामाला सुरूवात होत आहे. गेल्या कित्येक दिवसाने काम सुरू होणार अशाच गप्पा सातत्याने लागणारे सामुग्री पण आणण्यात आली आहे, दिपमाळ साफसफाई चे काम पण चालू आहे, मंदिर जिर्णोद्धार साठी शिळा व उतर साहित्य येताच येळकोट येळकोट जय मल्हार चा जय जय कार सुरू झाला.
श्री क्षेत्र सातारा खंडोबा देवस्थानचे अध्यक्ष रमेश चोपडे, सचिव साहेबराव पळसकर यांनी मंदिरदिपमाळ जिर्णोद्धारसाठी आलेल्या साधन सामग्रीची रविवारी पाहणी केली. यावेळी विश्वस्त सुखदेव बनगर. सोमीनाथ शिराणे. श्रीधर दसपुते , तसेच नागरिकासह अजय चोपडे यांची उपस्थिती होती.
मंदिराचे काम लवकरच सुरू करावे..
कित्येक दिवसापासून थांबलेल्या कामाला प्रत्येक्षात गुणवत्तेत सुरूवात करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. गुरूवारी कामाला सुरूवात होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.
कित्येक दिवसापासून रखडलेल्या खंडोबा मंदिराच्या विकास कामासाठी सामुग्री व शिळा दाखल करण्यात आल्या त्यावेळी पाहणी करताना अध्यक्ष रमेश चोपडे, सचिव साहेबराव पळसकर,विश्वस्त सुखदेव बनगर. सोमीनाथ शिराणे. श्रीधर दसपुते , तसेच नागरिकासह अजय चोपडे दिसत आहे.