३७ कोटींच्या शिल्लेगाव लघु मध्यम प्रकल्पात ७ वर्षांत थेंबभरही पाणी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 12:28 AM2019-01-21T00:28:29+5:302019-01-21T00:28:42+5:30
वरदान नव्हे शाप : ४० गावांचा घसा कोरडाच
विनोद जाधव
लासूर स्टेशन : शेतकऱ्यांना शाप, तर पुढाºयांना वरदान ठरत असलेल्या ३७ कोटी रुपये किंमतीच्या शिल्लेगाव लघु मध्यम प्रकल्पात गेल्या सात वर्षांत एक टक्काही पाणी आलेले नाही. चुकीच्या ठिकाणी बांधण्यात आलेल्या या प्रकल्पाचा उद्देश साध्य करण्यासाठी संबंधित विभागाने इतर ठिकाणाहून पाणी आणण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची मागणी जनतेतून होत आहे.
गंगापूर -लासूर स्टेशन रस्त्यावर असलेला शिल्लेगाव लघु मध्यम प्रकल्प आतापर्यंत तरी परिसराला पांढरा हत्तीच ठरला आहे. या प्रकल्पाच्या उभारणीदरम्यान झालेल्या राजकीय हस्तक्षेपामुळे या प्रकल्पाची मूळ जागा बदलण्यात आल्याची चर्चा आहे. राजकीय दबावापुढे प्रशासन झुकल्याने ३७ कोटी रुपये खर्चून देखील हा प्रकल्प लाभ क्षेत्रातील सिंचन व्यवस्था तर सोडाच परंतु ग्रामस्थांची तहान देखील भागवू शकलेला नाही.
शिरेगाव, देवळीचे पुनर्वसन करून त्याठिकाणी हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. ज्या गावात प्रकल्प झाला त्याच गावाची तहान गेल्या सात वर्षांपासून टँकरने भागविली जात आहे. त्यावरून या प्रकल्पाचे अपयश सातत्याने उघडे पडत आहे. असे असतानाही संबंधित विभाग या प्रकल्पात पाणी आणण्यासाठी कुठल्याही प्रकारचे प्रयत्न करीत नसल्याचे दिसून येत आहे.
पुढाºयांकडून आश्वासनांची खैरात
या प्रकल्पात पाणी आणण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन देण्याची संधी या प्रकल्पामुळे प्रत्येक निवडणुकीच्या काळात पुढाºयांना मिळत आहे. परंतु परिसरातील तीस ते चाळीस गावातील शेतकºयांना या प्रकल्पाच्या अपयशामुळे दरवर्षी दुष्काळाशी सामना करावा लागत आहे.
चुकीच्या निर्णयामुळे संपूर्ण खर्च व्यर्थ
प्रशासनाच्या चुकीच्या निर्णयामुळे या प्रकल्पाचा संपूर्ण खर्च व्यर्थ ठरत आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची गरज असल्याचे दुष्काळ निवारण समितीचे तालुका अध्यक्ष दत्ता कºहाळे यांनी सांगितले. या प्रकल्पात पाणी आणण्यासाठीचे प्रयत्न राजकीय स्वार्थासाठी नव्हे तर नागरिकांच्या हितासाठी असले पाहिजे, असे शिवसेनेचे प्रशांत बनसोड यांनी सांगितले. या प्रकल्पामुळे पिण्याच्या पाण्याचाच प्रश्न सुटला नाही. तर शेतीसाठी लागणारे पाणी तर अशक्यच गोष्ट आहे. पावसाच्या पाण्यावर न भरणाºया या प्रकल्पात शिवना नदीतून तात्काळ पाणी आणण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे पुनर्वसित शिरेगावचे उपसरपंच नितीन कºहाळे यांनी सांगितले.
२००९ ते २०१८ मधील पाणी परिस्थिती
वर्षे पाणी साठा
२००९ १८.०८ %
२०१० ७०.८७ %
२०११ २९.०० %
२०१२ ० %
२०१३ ० %
२०१४ ० %
२०१५ ० %
२०१६ ० %
२०१७ ० %
२०१८ ० %