'५० खोके...' घोषणाबाजीनंतर शिंदे - ठाकरे गट भिडले; आ. बोरनारेंना काळे झेंडे दाखवल्याने तणाव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 03:49 PM2022-11-25T15:49:24+5:302022-11-25T15:52:03+5:30

वैजापूर तालुक्यातील महालगाव येथे शिंदे गट व ठाकरे गट आपसात भिडले

Shinde - Thackeray groups clash over '50 boxes...ekdam Ok' slogan; come Tension after showing black flags to MLA Ramesh Bornare | '५० खोके...' घोषणाबाजीनंतर शिंदे - ठाकरे गट भिडले; आ. बोरनारेंना काळे झेंडे दाखवल्याने तणाव

'५० खोके...' घोषणाबाजीनंतर शिंदे - ठाकरे गट भिडले; आ. बोरनारेंना काळे झेंडे दाखवल्याने तणाव

googlenewsNext

वैजापूर (औरंगाबाद):  तालुक्यातील महालगाव येथे शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांच्या हस्ते आज दुपारी एका भांडी भंडाराचे उद्घाटन होते. समारंभ आटोपल्यानंतर महालगाव येथील सरपंच बापूसाहेब झिंजुर्डे यांच्या घरी चहापाण्यासाठी आ. बोरनारे जात असताना अचानक 'पन्नास खोके, एकदम ओके' अशी घोषणाबाजी झाली. यावरून शिंदे आणि ठाकरे दोन्ही गट समोरासमोर आले. 

यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अविनाश पाटील गलांडे हेही तिथे पोहोचताच पुन्हा जोरदार घोषणाबाजी झाली. त्यातच आ. रमेश बोरनारे यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. विशेषतः महालगाव येथील आठवडी बाजार सुरु असताना हा प्रकार घडला. यामुळे एकच गोंधळ उडाला. सध्या येथे तणावपूर्ण शांतात असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. 

गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु 
याप्रकरणी शिंदे गट आणि ठाकरे गट आक्रमक झाले होते. दरम्यान, आ. बोरनारे यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील पोलीस कर्मचाऱ्यांसमोर घोषणाबाजी, काळे झेंडे दाखवणे हा प्रकार झाला. त्यांच्याकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती आहे. 

Web Title: Shinde - Thackeray groups clash over '50 boxes...ekdam Ok' slogan; come Tension after showing black flags to MLA Ramesh Bornare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.