औरंगाबाद 'पश्चिम'मध्ये शिंदेसेना आणि उद्धवसेना आमने-सामने; शिरसाटांना शिंदेंचे तगडे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 07:41 PM2024-11-05T19:41:33+5:302024-11-05T19:41:56+5:30

शिंदेसेनेने आ. शिरसाट यांना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे, तर उद्धवसेनेने राजू शिंदे यांना उमेदवारी दिली.

Shindesena and Uddhavsena face off in Aurangabad 'West'; A tough fight in MLA Sanjay Shirsat and Raju Shinde | औरंगाबाद 'पश्चिम'मध्ये शिंदेसेना आणि उद्धवसेना आमने-सामने; शिरसाटांना शिंदेंचे तगडे आव्हान

औरंगाबाद 'पश्चिम'मध्ये शिंदेसेना आणि उद्धवसेना आमने-सामने; शिरसाटांना शिंदेंचे तगडे आव्हान

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात आता १८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मतदारसंघात आता शिंदेसेना आणि उद्धवसेनेचे उमेदवार आमने-सामने आहेत.

शिंदेसेनेने आ. शिरसाट यांना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे, तर उद्धवसेनेने राजू शिंदे यांना उमेदवारी दिली. मागील निवडणुकीत शिंदे उमेदवार होते. यासोबतच रिपाइं (डेमोक्रॉटिक) पक्षाचे रमेश गायकवाड, बसपाचे कुणाल लांडगे, तर वंचित बहुजन आघाडीने अंजन लक्ष्मण साळवे हे निवडणूक रिंगणात आहे. गत निवडणुकीत वंचितचे उमेदवार संदीप शिरसाट आता महाराष्ट्र स्वराज्य पक्षाकडून मैदानात आहेत. हिंदुस्थान जनता पार्टीने अनिल धुपे यांना, तर बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीकडून अरुण कांबळे आणि पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॉटिक)चे कैलास सोनोने, रिपब्लिकन बहुजन सेनेकडून पंचशीला जाधव, संपूर्ण भारत क्रांती पार्टीचे मुकुंद गाढे, रिपब्लिकन पक्ष (खोरीप)चे संजीवकुमार इखारे आणि सात अपक्ष उमेदवार या मतदारसंघात आहेत. यंदाची ही निवडणूक चुरशीची होईल, असे चित्र दिसत आहे.

पश्चिममधील उमेदवार
शिवसेना : आ. संजय शिरसाट, उद्धवसेना- राजू शिंदे, वंचित बहुजन आघाडी - अंजन साळवे, बहुजन समाज पार्टी- कुणाल लांडगे, हिंदुस्थान जनता पार्टी- अनिल धुपे, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी- अरविंद कांबळे, पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) - कैलास सोनोने, रिपब्लिकन बहुजन सेना- पंचशीला जाधव, संपूर्ण भारत क्रांती पार्टी- मुकुंद गाढे, रिपब्लिकन पक्ष(खोरिपा)- संजीवकुमार इखारे, महाराष्ट्र स्वराज्य पार्टी- संदीप शिरसाट, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(डेमोक्रॉटीक)- रमेश गायकवाड, अपक्ष - अनिल जाधव, अपक्ष- जगन साळवे, अपक्ष- निखिल मगरे, अपक्ष- मधुकर त्रिभुवन, अपक्ष- मनीषा उर्फ मंदा खरात, अपक्ष- सुलोचना आकशे

Web Title: Shindesena and Uddhavsena face off in Aurangabad 'West'; A tough fight in MLA Sanjay Shirsat and Raju Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.